In 1884 there were 2 lakh 88 thousand 824 Kunbis in Sambhajinagar (Aurangabad) district : १८८४ साली संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात होते २ लाख ८८ हजार ८२४ कुणबी; निजाम गॅझेटियरमध्ये महत्वाची माहिती…

In 1884 there were 2 lakh 88 thousand 824 Kunbis in Sambhajinagar (Aurangabad) district : सध्या मराठा व कुणबी एकच असून, निजाम काळात मराठा असलेल्या नागरिकांना कुणबी असे म्हटले जात होते. त्यांना त्या सवलती सुद्धा मिळत होत्या. निजाम काळात कुणबी असणारा समाज हा मराठाच असल्याचे १८८४ चे निजाम गॅझेटियर उपलब्ध असून त्या गॅझेटियरच्या ई-आवृत्तीमध्ये (In e-version) मराठा व कुणबी एकच असल्याचा उल्लेख सन 2006 मध्ये वगळण्यात आला. मात्र, कुणबी आणि मराठा एकच असल्याचे अनेक उल्लेख गॅझेटमध्ये सापडतात.

मराठा आरक्षण (Maratha Reservation) न्याय हक्क परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक श्री रवींद्र बनसोड यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देताना सांगितलें की निजामाच्या काळातील गॅझेटियर ऑफ द निजाम्स डमेनिअसन्स औरंगाबाद डिस्ट्रिक्ट १८८४ प्रमाणे एकट्या संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात कुणबी जातीची लोकसंख्या २ लाख ८८ हजार ८२४ होती. आणि हे प्रमाण एकूण लोकसंख्येत ४०.६३% होते. यावरून कुणबी समाज म्हणजेच मराठा हाेय.

१८८१ च्या जनगणनेतही एकच जात अशी नाेंद
मराठा कंट्री, मराठा बुक्स, मराठा ब्राह्मण असे उल्लेख सुद्धा निजाम गॅझेटियरमध्ये आहेत. कुणबी हा उल्लेख हा आजच्या मराठा जातीकरीतच असल्याचे विविध संदर्भातून स्पष्ट होते असल्याचे सुद्धा प्रा. बनसोड यांनी स्पष्ट केले. याबाबत डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी संशोधन केले असून, त्यांच्याकडे गॅझेटची मूळ प्रत असल्याचे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले. १८८१ च्या जनगणनेमध्ये कुणबी व मराठा एकच असल्याची नोंद केल्याचेही ते म्हणाले.

कुणबी-मराठामध्ये होते रोटी-बेटीचे व्यवहार
कुणबी व मराठामध्ये रोटी-बेटीचे असंख्य व्यवहार झालेले आहेत. संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा देवयाणी डोणगावकर या कुणबीमध्ये येतात तर त्यांचे पती कृष्णा डोणगावकर मराठा मध्ये येतात. या प्रकारची असंख्य उदाहरणे आपल्याला देता येतील, असेही प्रा. रविंद्र बनसोड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!