जालन्यात आयकर विभागाचे छापे..! 390 कोटींची बेहिशोबी संपत्ती जप्त..

केंद्रीय तपास यंत्रणा ईडीनंतर आता आयकर विभागही कारवाई करण्याच्या मूडमध्ये आहे. बंगालपाठोपाठ महाराष्ट्रातही आयकर विभागाच्या छाप्यांमध्ये मोठी रोकड सापडली आहे. महाराष्ट्रातील जालन्यात आयकर विभागाने स्टील, कापड व्यापारी आणि रिअल इस्टेट डेव्हलपरवर छापे टाकले असून, त्यामध्ये विभागाला मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. आयकर विभागाने सुमारे 390 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली असून, त्यात 58 कोटी रुपये रोख, 32 किलो सोने, हिरे आणि मोती आणि अनेक मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत.

छाप्यात सापडलेली रोकड मोजण्यासाठी विभागाला 13 तास लागले. 1 ते 8 ऑगस्ट दरम्यान आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. आयकर विभागाच्या नाशिक शाखेने ही कारवाई केली आहे. या कारवाईत राज्यभरातील 260 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. आयटी कर्मचाऱ्यांची पाच पथकांमध्ये विभागणी करण्यात आली असून छाप्यांमध्ये 120 हून अधिक वाहनांचा वापर करण्यात आला आहे.

रक्कम मोजण्यासाठी लागले तब्बल 13 तास

कापड व स्टील व्यापाऱ्याच्या घरातून सापडलेली रोकड जालना येथील स्थानिक स्टेट बँकेच्या शाखेत नेऊन मोजण्यात आली. रोख मोजणी सकाळी 11 वाजता सुरू झाली आणि रात्री 1 वाजण्याच्या सुमारास संपली. जालन्यातील चार स्टील कंपन्यांच्या व्यवहारात अनियमितता असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती, त्यानंतर आयकर विभाग कारवाईत आला. आयटी पथकाने घर आणि कारखान्यांवर छापे टाकले. पथकाला घरात काहीही मिळाले नसले तरी शहराबाहेरील फार्महाऊसवर रोख रक्कम आणि सोने, हिऱ्यांसह अनेक प्रॉपर्टीची कागदपत्रे जप्त करण्यात आली.

महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन..! केंद्र शासनाची मोठी योजना, अर्ज कसा करालं..? जाणून घ्या

जालन्यातील चार स्टील व्यावसायिकांवर हे छापे टाकण्यात आले. त्यातील तिघांकडे रोख रकमेसह सोन्याचे दागिने, बिस्कीटे, नाणी आणि हिरे सापडले आहत. सोन्याच्या 32 किलो दागिन्यांची किंमत बाजारभावानुसार 16 कोटी रुपये आहे. याशिवाय प्राप्तिकर विभागाला जमिनी, शेती, बंगल्यांची कागदपत्रे आणि बँकांतील ठेवी आणि इतर व्यवहारांचे महत्वाचे दस्ताऐवज हाती लागले आहेत.

मॅरेजपार्टीचे स्टीकरलावून आयकर विभागाच्या गाड्या झाल्या होत्या जालन्यात दाखल

जालना शहरात विवाह सोहळ्याचे स्टिकर लावून आयकर (IT) विभागाचे 100 पेक्षा जास्त वाहने जालन्यात दाखल झाले होते. एखाद्या सिनेमाला लाजवले असा छापा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जालन्यामध्ये टाकला. छापा टाकण्यासाठी येत असल्याची खबर कुणाला लागू नये म्हणून आयकर विभागाचे अधिकारी चक्क वऱ्हाडी बनून आले होते. दुल्हन हम ले जायेंगे आणि राहुल वेड्स अंजली असे स्टिकर लावलेल्या गाड्यांमध्ये आयकर विभागाचे अधिकारी जालन्यात पोहोचले होते आणि सलग आठ दिवस छापे मारून 390 कोटी बेनामी संपत्तीचा पर्दाफाश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!