India Post GDS Bharti 2023: इंडिया पोस्टच्या तब्बल 30 हजार 41 पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू, 10 उत्तीर्ण पात्रता असलेल्यांना परीक्षेशिवाय नोकरी मिळेल…
India Post GDS Bharti 2023: इंडिया पोस्टने ग्रामीण डाक सेवकाच्या 30 हजार 41 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आज दिनांक 3 ऑगस्टपासून सुरू झाली असून अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाला 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिवाय उमेदवार कोणत्याही लेखी अर्जाशिवाय या भरतीसाठी अर्ज करू शकतात. निवड परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारेच केली जाईल.
Indian Post GDS Bharti 2023: इंडियन पोस्टने ग्रामीण डाक सेवक आणि शाखा पोस्ट मास्टरच्या तब्बल 30 हजार 41 पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेसह, पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया देखील आज, 3 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 23 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना 10वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच, हे अर्ज केवळ ऑनलाइन माध्यमातून करता येतील.
उमेदवारांची निवड ही गुणवत्तेवर आधारित असते. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. जीडीएस पदांसाठी इच्छुक असलेले उमेदवार 10वी उत्तीर्ण असले पाहिजेत आणि उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. इंडिया पोस्ट 10वी गुणांच्या टक्केवारीच्या आधारावर उमेदवारांची नियुक्ती करेल. या पदांसाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना रु. 12,000/- ते रु. 24,470/- पर्यंत वेतन दिले जाईल.
संस्थेचे नाव: इंडिया पोस्ट
पदांचे नाव:
➢ ग्रामीण डाक सेवक (GDS)
➢ शाखा पोस्ट मास्टर (BPM)
पदांची संख्या: ३००४१
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: ३ ऑगस्ट २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.indiapost.gov.in
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.
शैक्षणिक योग्यता: भारत सरकार/राज्य सरकारांद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही शालेय शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या गणित आणि इंग्रजीसह (अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून अभ्यास केलेला) इयत्ता 10वी उत्तीर्ण होण्याचे माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. भारतातील केंद्रशासित प्रदेशांमध्ये जीडीएसच्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी ही अनिवार्य शैक्षणिक पात्रता असेल. अनिवार्य किंवा ऐच्छिक विषय म्हणून उमेदवारांना किमान माध्यमिक इयत्तेपर्यंत स्थानिक भाषेचे ज्ञान असले पाहिजे.
अर्ज फी :
◆ UR/OBC/EWS : 100/-
◆ SC/ST/PWD/स्त्री : 0
● पेमेंट मोड : ऑनलाइन
राज्यानुसार रिक्त पदांची संख्या
- महाराष्ट्र : 76 + 3078
- आंध्रप्रदेश : 1058
- आसाम : 855
- बिहार : 2300
- छत्तीसगढ़ : 721
- दिल्ली : 22
- गुजरात : 1850
- हरियाणा : 215
- हिमाचल प्रदेश : 418
- जम्मू -कश्मीर : 300
- झारखंड : 530
- कर्नाटक : 1714
- केरल : 1508
- मध्य प्रदेश : 1565
- नार्थ ईस्ट : 500
- ओडिशा : 1279
- पंजाब : 336
- राजस्थान : 2031
- तामिळनाडू :2994
- तेलंगना : 961
- उत्तर प्रदेश : 3084
- उत्तराखंड : 519
- पश्चिम बंगाल : 2127
एकूण पदे = 30041
आवश्यक कागदपत्रे: इंडिया पोस्ट GDS भर्ती 2023 साठी, उमेदवाराकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड.
- दहावीची गुणपत्रिका.
- मूळ पत्ता पुरावा.
- पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
- जात प्रमाणपत्र
- PWD प्रमाणपत्र (असल्यास)
- इतर कोणतेही प्रमाणपत्र ज्यासाठी उमेदवाराला लाभ हवा आहे.
How to Apply India Post GDS Recruitment 2023
Indian Post GDSसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा? इंडिया पोस्ट GDS भर्ती 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खाली दिली आहे. खाली दिलेल्या स्टेप बाय स्टेप प्रक्रियेचे अनुसरण करून उमेदवार इंडिया पोस्ट GDS भर्ती 2023 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट उघडा.
- यानंतर तुम्हाला होम पेजवरील रिक्रूटमेंट सेक्शनवर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला India Post GDS Recruitment 2023 वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर, इंडिया पोस्ट जीडीएस भर्ती 2023 ची अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी लागेल.
- त्यानंतर उमेदवाराला Apply Online वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर, उमेदवाराने अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल.
- त्यानंतर तुमची आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर तो अंतिम सबमिट करावा लागेल.
- शेवटी, तुम्हाला अर्जाची प्रिंट आउट घ्यावी लागेल आणि ती सुरक्षित ठेवावी लागेल.