PM Kisan : खात्यात जमा झाले नसेल 14 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये, तर या नंबरवर कॉल करा, लगेच येतील पैसे…

PM Kisan 14th installment..! भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जुलै 2023 रोजी राजस्थानमधील एका कार्यक्रमात 14 व्या हप्त्याचे वितरीन केले.

मात्र प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 14 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. मात्र 7 दिवस वाट पाहून सुद्धा काही लाभार्थ्यांचा खात्यात ही दोन हजारांची रक्कम आलेली नाही.

PM Kisan 14th installment: पण आता काळजी करू नका, हफ्त्याची दोन हजारांची रक्कम न आल्यामुळे परेशान होण्याची गरज नाही. लाभार्थी घरबसल्या 14व्या हफ्त्याचे स्टेटस जाणून घेऊ शकतात. त्यासाठी लाभार्थ्यांना pmkisan.gov.in वेबसाईटवर लॉगीन करून Know Your Status या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा.

कॅप्चा कोड टाकल्यावर Gate Data या पर्यायावर क्लिक करावा. नंतर मोबाइलच्या स्क्रीनवर 14व्या हफ्त्याबद्दल सर्व माहिती दिसेल. या माहितीत काही चूक असेल तर सुधारा, जसे की बँक डिटेल्स.

या नंबरवर कॉल करा PM Kisan Sanman 14th installment
PM KISAN सन्मान योजनेच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही टोल फ्री क्रमांक 155261 वर संपर्क साधू शकतात. तुमचे नाव लाभार्थी यादीत नाव आहे की नाही? तुम्ही ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही? तुमच्या खात्यात पैसे येतील की नाही? अशी सर्व प्रकारची माहिती तुम्हाला या नंबरवर काॅल केल्यावर लगेच मिळू शकते.

कृषी मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून ही माहिती सर्वांना देण्यात आली असून त्यात म्हटले की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी केलेल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी लाभार्थी शेतकरी 155261 या क्रमांकावर कॉल करू शकतात. याशिवाय, शेतकरी 1800115526 अथवा 011-23381092 या Toll free नंबर वरदेखील संपर्क साधू शकता.

लक्षात ठेवा: केंद्र सरकारने PM KISAN योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी (E- KYC) करने बंधनकारक केलंय. लाभार्थ्यांनी ई-केवायसची प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास त्यांना 14वा हफ्ता मिळणार नाही. तुम्ही ई केवायसी किंवा इतर आवश्यक बाबींची पूर्तता केली असेल, तर आणि तरच तुमच्या खात्यात 14व्या हफ्त्याची रक्कम जमा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!