25 रुपयांत घरबसल्या मिळणार तिरंगा, पोस्ट ऑफिस करणार फ्री होम डिलिव्हरी, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..

Independence Day 2022: जर तुम्ही अद्याप स्वातंत्र्य दिनासाठी तिरंगा खरेदी केला नसेल तर पोस्ट ऑफिस तुम्हाला यामध्ये मदत करेल. पोस्ट ऑफिस तुम्हाला घरबसल्या स्वस्त दरात तिरंगा ध्वज पोहोचवेल.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत सर्व देशवासीयांनी आपल्या घरासमोर तिरंगा फडकावा, असे आवाहन केले. देशवासियांच्या मनात देशभक्तीची लाट आणण्यासाठी मोदी सरकार ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवत आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरासमोर राष्ट्रध्वज फडकवणे हा देखील त्याचाच एक भाग आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकांनी त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइल फोटोंमध्ये देशाचा राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंगा लावावा. तुम्हालाही या मोहिमेत सहभागी व्हायचे असेल तर लवकरात लवकर तिरंगा ऑर्डर करा. पोस्ट ऑफिस तुमच्या घरापर्यंत तिरंगा पोहोचवण्यास मदत करेल.

पोस्ट ऑफिस फक्त 25 रुपयांमध्ये ध्वज तुमच्या घरी पोहोचवेल. हे शुल्क प्रत्यक्षात पोस्ट ऑफिसच्या डिलिव्हरीसाठी नाही, तर ध्वजासाठी आहे. पोस्ट ऑफिस ही सेवा मोफत देत आहे. 1 ऑगस्टपासून टपाल कार्यालयातून 25 रुपयांना झेंड्यांची विक्री सुरू झाली आहे. तुम्ही ऑर्डर पण करू शकता.

पोस्ट ऑफिसमधून राष्ट्रध्वज कसा खरेदी करायचा?

● सर्वप्रथम पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइट epostoffice.gov.in वर जा.
● येथे तुम्हाला होम पेजवर राष्ट्रध्वज दिसेल, ज्यावर तुम्हाला खरेदी करण्यासाठी क्लिक करावे लागेल.
● येथे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता, झेंड्याची संख्या आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल.
● यानंतर तुम्हाला ऑर्डरची पुष्टी करण्यासाठी पेमेंट प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
● कृपया लक्षात ठेवा की तुम्ही एकदा ऑर्डर दिल्यानंतर तुम्ही ती रद्द करू शकणार नाही. तुमचा तिरंगा घराघरात पोहोचेल.

घरी झेंडा फडकवण्यासाठी तुम्हाला ध्वजसंहितेचे पालन करावे लागेल. तसेच, नागरिकांना घरपोच झेंडा मिळावा याकरिता केंद्र सरकारने पोस्ट ऑफिसला सुचना केल्या आहेत.

रात्री सुद्धा तिरंगा फडकवता येईल.
पूर्वीच्या नियमानुसार सकाळी सूर्योदयानंतर आणि सूर्यास्त होईपर्यंत तिरंगा फडकावला जात असे. मात्र अलीकडे त्याचे नियम बदलण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार राष्ट्रध्वज दिवसाबरोबरच रात्री देखील फडकता येणार आहे.

‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत विभागाने आपल्या ई-पोस्ट ऑफिस पोर्टलवरून राष्ट्रध्वजाची विक्री करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या पोर्टलवर जाऊन ग्राहक ऑनलाइन ऑर्डर करू शकतील. तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून तिरंगा वितरित केला जाईल. ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त या अभियानांतर्गत प्रत्येक मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये सेल्फी पॉइंटही बनवण्यात येणार आहे.

ई-पोस्ट ऑफिस पोर्टलद्वारे राष्ट्रध्वजाची ऑनलाइन विक्री करण्यासाठी विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे आहेत.

एनआयसी 20 इंच x 30 इंच राष्ट्रध्वज (पोलशिवाय ध्वज) विक्रीसाठी ई-पोस्ट ऑफिस पोर्टलवर आवश्यक तरतूद करेल. हे ध्वजही प्रत्येक पोस्टमनला जनतेला विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जातील. पोस्ट ऑफिसही लोकांमध्ये अधिकाधिक झेंडे आणण्याच्या तयारीला अंतिम रूप देत आहे.

भारतीय टपाल विभागाने यासाठी टोकन मनी फक्त 25 रुपये ठेवली आहेत. त्यावर जीएसटी आकारला जाणार नाही. हे तिरंगे पॉलिस्टरचे बनलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!