औरंगाबादेत पुन्हा ऑनलाइन तलवारीची खरेदी! पोलिसांकडून तीन तलवारी जप्त, तिघे जण जेरबंद..

मागील आठवड्यात औरंगाबादमध्ये DTDC कुरियर कंपनीद्वारे मागवण्यात आलेल्या 37 तलवारी व एक कुकरी जप्त करण्यात आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.

आता परत औरंगाबाद शहरातील क्रांती चौक पोलिसांनी तीन तलवारी जप्त केल्या असून बनावट नाव आणि पत्यावर ऑनलाइन तलवारी मागविणाऱ्या तीन जणांना क्रांती चौक पोलिसांनी काल रविवार दिनांक 3 एप्रिल रोजी अटक करून अजून 3 तलवारी जप्त केल्या आहेत.

पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपीने यापूर्वी देखील ऑनलाइन तलवारी खरेदी केल्याचे कबूल केले असून यामधील एक तलवार घरात तर अन्य दोन तलवारी दोन जणांना विक्री केल्याचे सांगितले. अबरार शेख जमील उर्फ शाहरूख असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. औरंगाबादमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तलवारी का मागवले जातात याचा तपास करने हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

पोलीस सुद्धा आवक्

औरंगाबादमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि तलवारी का येतात? कुठुन आणि कशी येतात? यासारखे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मागील आठवड्यात झालेल्या कारवाईनंतर अशी माहिती मिळाली होती की, पंजाब मधील जालिंदर आणि अमृतसर येथून तलवारी मागवण्यात आल्या होत्या. या 37 तलवारी 7 जणांच्या नावावर मागवण्यात आल्या होत्या. यातील पाच जण औरंगाबाद येथील तर दोन जण जालन्यामधील होते.

आता ऑनलाइन तंत्रज्ञानामुळे मोबाईल वरुन सहज ऑनलाईन तलवारी मागवता येतात. दिल्ली, अमृतसर आणि राजस्थानमधून हे शास्त्र भिवंडी येथील गोडाऊनमध्ये येतात आणि तिथून राज्यभर वितरित करण्यात येतात. मात्र औरंगाबाद मध्ये DTDC या कुरियर कंपनीच्या मार्फतच तलवारी का येतात हा एक प्रश्न आहे. अशा कुरियर कंपनीद्वारे सजावटीच्या वस्तू म्हणून तलवारी मागवल्या जातात आणि त्यानंतर त्याला धार लावली जाते, अशी माहिती मिळाली आहे. या तलवारी ज्यांच्या नावावर आणि पत्त्यावर मागवण्यात आल्या, त्यांचे नाव आणि पत्ते सुद्धा अर्धवट असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे या तलवारी कोणत्या उद्देशासाठी मागवल्या होत्या हे शोधणं पोलिसांसमोर आव्हान आहे.

औरंगाबादमध्ये 2018 नंतर झालेल्या दंगलीनंतर मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा मागवण्यात आला होता. यापूर्वी सुद्धा जुलै 2021 मध्ये 41 तलवारी, दोन गुप्ती आणि 6 कुकरी असा शस्त्रांचा मोठा साठा पोलिसांद्वारे जप्त करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!