SSC १९२० पदांसाठी जम्बो भरती, दहावी उत्तीर्णांपासून पीजी उमेदवारांना संधी..

SSC Bharti 2022 Details:

SSC फेज X स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे SSC सिलेक्शन पोस्ट फेज १० ची परीक्षा सर्वच स्तरांवर एकूण १९२० रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी घेतली जाईल.

माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवीधर आणि उच्च स्तरीय उमेदवारांकरिता ३३४ प्रकारची रिक्त पदे यावेळी जाहीर करण्यात आली असून SSC ने जारी केलेल्या आधीसूचनेनुसार, सिलेक्शन पोस्ट फेज १० करिता अर्ज करण्याची प्रक्रिया गुरुवार, १२ मे पासून सुरू झालेली असून उमेदवार १३ जून २०२२ पर्यंत अर्ज सादर करू शकतात. त्यासोबतच ऑगस्ट महिन्यामध्ये परीक्षा घेण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे.

SSCने जाहीर केलेल्या २०२१-२२ च्या परीक्षेच्या वेळापत्रका-नुसार, १० मे रोजी सिलेक्शन पोस्टसाठी अधिसूचना जारी केली जाणार होती आणि अर्ज ९ जून २०२२ पर्यंत करायचे होते. मात्र आयोगाने नवीन सूचना जारी करताना नवीन अर्ज तारखा तसेच परीक्षेची तात्पुरती तारीख जाहीर केलेली आहे.

👉🏻 पदसंख्या – 1920 जागा
👉🏻 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
👉🏻 अर्ज पद्धती – ऑनलाईन
👉🏻 अर्ज सुरू होण्याची तारीख – 12 मे 2022
👉🏻 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2022
👉🏻 अधिकृत वेबसाईटssc.nic.in

How to Apply For SSC Phase-X 2022

इच्छुक आणि पात्र उमेदवार कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर SSC निवड पोस्ट फेज १० साठी अर्ज करू शकतील. मुख्यपृष्ठावर दिलेल्या लॉगिन विभागात नोंदणीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल आणि आवश्यक तपशील भरून सबमिट करावे लागेल.

यानंतर SSC द्वारे दिलेला नोंदणी क्रमांक आणि पासवर्डद्वारे लॉग इन करून संबंधित स्तरावरील (१० वी किंवा १२ वी किंवा पदवीधर आणि उच्च) पदांकरिता अर्ज सबमिट करू शकाल. या दरम्यान, उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून १०० रुपये शुल्क देखील भरावे लागेल.

▪️या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
▪️ खाली दिलेल्या लिंकद्वारे अर्ज करावे
▪️देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची कोणतीही दखल घेतली जाणार नाही.
▪️अर्ज सादर करण्याच्या विस्तृत सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
▪️अपुर्ण कागदपत्रे किंवा माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र घोषित केले जाईल.
▪️प्रक्रिया करण्यासाठी “नवीन नोंदणी” वर क्लिक करा.
▪️प्रत्येक उमेदवारांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड हा त्यांच्या ई-मेल खात्यावर ई-मेल केला जाईल.

▪️तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन केल्यानंतर, “अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
▪️अर्जावर तुमची वैयक्तिक माहिती भरा, जसे की नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, तसेच शैक्षणिक इतिहास ई.
▪️अर्ज नाकारला जाऊ नये याकरीता स्कॅन केलेले पासपोर्ट आकाराचे फोटो आणि स्वाक्षरी प्रमाणबद्ध परिमाण आणि आकारात JPG फॉरमॅटमध्ये अपलोड करावी.
▪️अर्ज फी भरण्यासाठी तुम्हाला डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वा नेट बँकिंग वापर करता येईल.
▪️अर्ज करण्याची संतीम तारीख 13 जून 2022 आहे.

Similar Posts