Asha Sevika Job : मुंबई महानगरपालिकेमध्ये तब्बल 5,575 जागेवर पदभरती प्रक्रिया 2023 ! लगेच अर्ज करा !

Asha Sevika Job : मुंबई महानगरपालिकेमध्ये तब्बल 5575 पदाकरीता मेगा भरतीची प्रक्रिया राबविण्याचा मोठा निर्णय पालिका प्रशासनांकडून घेण्यात आलेला आहे . ही पदभरती प्रक्रिया बाबत अधिकृत्त जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली असून, पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या मेगा पदभरती बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे..

या पदभरतीमध्ये आशा सेविका पदांच्या तब्बल 5,575 जागेवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदाकरीता अर्ज करण्यासाठी केवळ महिला उमेदवार पात्र ठरणार आहेत.

भरतीचे अटी व नियम.. Asha Sevika Job
▪️उमेदवार इयत्ता 10वी पास असणे आवश्यक आहे अथवा साक्षर असणे आवश्यक आहे.
▪️शिवाय उमेदवाराचे किमान वय 25 वर्षे तर कमाल वय 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
▪️त्याचबरोबर उमेदवार ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे व सदर उमेदवारास मराठी वाचता, लिहीता व बोलता येणे आवश्यक आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये 1000 ते 1200 लोकसंख्येसाठी एक या प्रमाणात आशा स्वयंसेविका पडान्स पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

कामाचे स्वरुप– Asha Sevika Job
▪️आशा सेविका वस्तीपातळीवर गृहभेटी देवून सर्वेक्षण करावे लागेल.
▪️नेमून दिलेल्या परिसरात सर्वेक्षण करुन विविध आजारांचे रुग्ण, गरोदर माता आणि बालकांचे लसीकरण, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार इत्यादीबाबत प्रबोधन व उपाययोजना बाबतचे कार्य करावे लागेल.

पात्रता–
▪️आशा स्वयंसेविका पदांकरीता केवळ महिला उमेदवारांनाच अर्ज सादर करता येईल.
▪️सदर महिला उमेदवाराचे वय 25 वर्षे ते 45 वर्षादरम्याने असणे आवश्यक आहे.
▪️आशा स्वयंसेविकेमध्ये नेतृत्वगुण असणे आवश्यक असून समुदायाशी संवाद साधण्याची क्षमता असणे अत्यंत आवश्यक आहे.
▪️उमेदवाराचे किमान 10वी पर्यंतचे शिक्षण पुर्ण झालेले असावे.

ऑफलाईन अर्ज प्रक्रिया – Asha Sevika Job
पात्र महिला उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने विभागीय वैद्यकिय आरोग्य अधिकारी कार्यालय (ए ते टी विभाग कार्यालय ) या पत्त्यावर दि.13 मार्च 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधी सादर करायचे आहे.

या कामावर आधारित मोबदला तत्वावरील कामासाठी पात्रता धारणा करणाऱया इच्छुक महिला उमेदवारांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!