रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया मध्ये 90 हजार पगाराची नोकरी; पदवीधरांना सुवर्णसंधी..

Job in RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. क्यूरेटर, श्रेणी ‘ए’, वास्तुकार, अग्निशमन अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

1. क्यूरेटर श्रेणी ‘ए’ [Curator in Grade ‘A’]

– या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post-Graduation Degree (पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारानी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. Job in RBI

2. वास्तुकार (Architect on full time contract)

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor of Architecture (बॅचरल ऑफ आर्किटेक्चर) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारानी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. Job in RBI

3. अग्निशमन अधिकारी (Fire Officer in Grade ‘A’)

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE/B.Tech in fire engineering/ safety and fire engineering पर्यंत शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. उमेदवाराना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसेच या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

किती मिळणार पगार

1. क्यूरेटर श्रेणी ‘ए’ – 90,100/- रुपये प्रतिमहिना
2. वास्तुकार – 28.20 लाख – 33.60 लाख प्रतिवर्ष
3. अग्निशमन अधिकारी – 90,100/- रुपये प्रतिमहिना

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करा – https://ibpsonline.ibps.in/rbimacapr22/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!