Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2022 Online Apply | कुसुम सोलर पंप योजना असा करा मोबाईलवर अर्ज

Kusum Solar Pump Yojana
Kusum Solar Pump Yojana

Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2022 Online Apply: रब्बी हंगाम सुरू झाला आहे. अनेक शेतकऱ्यांची हरभरा, गहू पेरणी झाली तर काही शेतकऱ्यांची पेरणी अजून बाकी आहे. ऐन रब्बी हंगामात लाईटची झंझट सुरू होते. जेव्हा लाईटची गरज असते तेव्हा फार कमी वेळ शेतातील लाईट मिळते.

लाईट असल्यास एखाद्या वेळी ट्रान्सफॉर्मर मध्ये काही फॉल्ट येतो तर कधी कधी शेतकऱ्यांची मोटार जळते. यामुळे शेतकरी अडचणीत येतो. शेतकरी लाईटमुळे अडचणीत येतो. शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी कुसुम सोलर पंप योजना सुरू करण्यात आली. Kusum Solar Pump Yojana Online Apply

कारण लाईट नसल्यामुळे शेतातील सगळ्याच गोष्टी खोळंबून जातात. सोलर पंपामुळे शेतकरी बंधू विजेच्या झंझटीतून मुक्त झाले आहेत. ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत असणारी एक योजना जिचे नाव प्रधानमंत्री कुसुम ब असे असून या योजनेच्या माध्यमातून सोलर पंपासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

महाऊर्जाच्या वतीने शेतकरी बांधवाना असे आवाहन करण्यात आले आहे की, सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करावेत‌. हे अभियान घटक महाउर्जा मार्फत अर्जदारांचे ऑनलाईन अर्ज मागवून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर सोलर पंप दिल्या जातो. Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2022

कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के तर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदानावर सोलर पंप दिल्या जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही मोबाईलवर अर्ज करू शकता. kusum solar pump yojana online application

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
सातबारा उतारा
8 अ उतारा
आधार कार्ड
बॅंक पासबुक

कुसुम सोलर पंप योजना असा करा मोबाईलवर अर्ज
▪️ कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महाउर्जाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागणार आहे.
▪️ त्यासाठी मोबाईलमध्ये ‘Google Chrome’ ब्राउजर ओपन करा. त्यामध्ये ‘mahaurja’ असं सर्च करा.
▪️ महाउर्जा वेबसाईट ओपन झाल्यानंतर, ‘कुसुम सोलर पंप अर्ज नोंदणी’ पर्यायावर क्लिक करा.
▪️ यानंतर, तुमच्यासमोर काही सूचना येतील त्या वाचून घेऊन क्लोज करा.
▪️ आता तुमच्यासमोर कुसुम सोलर पंप योजनेचा अर्ज ओपन होईल.


▪️ अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरून, 100 रुपयांचे पेमेंट करा.
▪️ अर्ज सबमिट झाल्यानंतर, वरील दिलेली कागदपत्रे म्हणजेच मागितलेली कागदपत्रे अपलोड करा.
▪️ तुम्हाला कोणता सोलर पंप घ्यायचा आहे व किती एचपी चा घ्यायचा आहे, ते निवडा.
▪️ सर्वात शेवटी अर्ज सबमिट करा.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!