Land Grabbing Act: तुमची जमीन सावकाराने हडपलिय का? १५ वर्षांच्या आत ‘या ठिकाणी’ पुराव्यानिशी अर्ज करा अन् हडपलेली जमीन परत मिळवा

Land Grabbing Act: खासगी सावकारांच्या पिळवणुकीला निर्बंध घालण्याकरिता राज्य सरकारने दिनांक १६ जानेवारी २०१४ रोजी ‘महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम’ संपूर्ण राज्यभरात लागू केला असून त्याअंतर्गत विश्वासघात करून जमीन बळकावणाऱ्या खासगी सावकाराविरूद्ध संबंधित शेतकऱ्याला जिल्हा उपनिबंधकांकडे (सहकार) थेट तक्रार करता येते.

त्या कायद्यानुसार विश्वासघात करून बनवलेले खरेदीखत सरळ सरळ रद्द करण्याचा अधिकार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. मात्र, त्याखरेदी खताचा अवधी तक्रार केल्याच्या दिवसापासून मागील १५ वर्षांपर्यंतचा तो खटला असणे बंधनकारक आहे.

राज्यात दरवर्षी हजारो-लाखो शेतकरी आर्थिक अडचणीच्यावेळी खासगी सावकारांकडून कर्ज घेतात. काहीजण परवानधारक सावकाराकडून सुद्धा कर्ज घेतात आणि भरमसाट चक्रवाढ व्याज आकारणी करून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावतात ही सत्य वस्तुस्थिती आहे. Land Grabbing Act

दरम्यान, बँकांतर्फे पीक कर्ज वाटणीसाठीचे निकष आणि त्याकरिता होणाऱ्या उशीरामुळे शेतकरी गावातीलच अथवा ओळखीतल्या सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याजाने कर्ज घेतात. मात्र, बऱ्याचवेळेस कर्जाच्या रकमेची वेळेवर परतफेड न केल्यामुळे खासगी सावकार कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याची जमिन हडपतो .

मात्र, शेतकऱ्याने अश्या सावकाराकडून कर्ज घेत असताना एखादी जमीन तारण म्हणून ठेवली असेल आणि सावकाराने बळजबरीने ती हडपल्यास अशी जमीन/मालमत्ता महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत परत मिळू शकते.

खासगी सावकाराने कोणत्याही शेतकऱ्याची जमीन हडपली असेल आणि संबंधित शेतकऱ्याने १५ वर्षांच्या आत त्याची तक्रार तालुक्याच्या ठिकाणी सहायक निबंधक अथवा थेट जिल्हा निबंधकांकडे केल्यावर खटला चालवून वस्तुस्थिती पडताळून निकाल देण्यात येतो.

असा व इथे करा अर्ज?

जमीन हडप झालेल्या शेतकऱ्याने तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सहायक निबंधकांजवळ अथवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अर्ज करायचा आहे. लक्षात ठेवा, सदरील प्रकरण हे अर्ज केल्याच्या तारखे पासून १५ वर्षे मागे जमिनीचे खरेदीखत झालेले असल्यावर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमा-अंतर्गत सदरील प्रकरण निकाली काढण्यात येते.

संबंधित शेतकऱ्याला एखाद्या साध्या कागदावर सुद्धा अर्ज करता येतो. माझ्या जमिनीवर संबंधित सावकाराने चुकीच्या पद्धतीने ताबा मिळवला आहे अथवा सावकाराने जमीन हडपलेली आहे, असे आशय त्या अर्जात नमूद करावे. शिवाय त्याबरोबरच संबंधित पुरावा म्हणून संबंधित शेतकऱ्याने सावकाराकडून घेतलेले कर्ज, त्यावरील व्याज, यासंबंधीची कागदपत्रे जोडणे बंधनकारक असते.

Similar Posts