Land record : वर्षानुवर्षाचे जमिनीचे वाद मिटवा फक्त पाच मिनिटात! पहा अटी व शासन निर्णय..

Land record : एखाद्या शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमिनीवर दुसऱ्याच शेतकऱ्याने ताबा मिळवला आहे किंवा दुसऱ्याच शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमिनीवर पहिला किंवा इतर कोणत्याही शेतकऱ्यांनी ताबा मिळवला आहे. तर अशावेळी आदलाबदल दस्ताची प्रक्रिया करण्यासाठी प्रशासन शेतकऱ्यांना सवलत देत आहे. यासाठी प्रशासनाने सलोखा योजना (Salokha Yojana Maharashtra 2023) राज्यात राबवली आहे.

शेत जमीन हा एक प्रत्येक शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा व महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे जमिनीबाबतचे वाद कौटुंबिक नात्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण करतात. त्यामुळे नागरिकांमध्ये दुरावा होतो. अशा वादामुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झाले आहे. हे आपल्याला पाहायला मिळाले असेलच असेल (Salokha Yojana Maharashtra). आजही तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे आणि आजच्या नव्या पिढीचा खर्च व वेळ वाया जात आहे. या गोष्टीवर विचार करून प्रशासनाने ही योजना राबवली आहे.

जमिनीबाबतचे होणारे वाद हे पूर्णपणे मिटवण्यासाठी कायदेशीरपणे काहीतरी मार्ग काढला पाहिजे असा प्रश्न तज्ञ लोकांनी कित्येकदा प्रशासनाकडे मांडला होता. आता त्या प्रश्नाला प्रशासनाने उत्तर दिले आहे. जमिनीबाबत आता वाद होऊ नये यासाठी प्रशासनाने कायदेशीर मार्ग काढला असून त्या मार्गाचा अवलंब केल्यास योग्य व्यक्तीला न्याय मिळणार आहे “Agriculture land record”. जर एखाद्या शेतकऱ्याने आपल्या हक्काच्या शेत जमिनीवर ताबा मिळवला असेल तर तो ताबा आपण काढून घेऊ शकतो. त्यासाठी मुद्रांक शुल्क फक्त एक हजार रुपये आणि नोंदणी फी फक्त एक हजार रुपये भरून आपली जमीन परत मिळवता येते.

Similar Posts