land record update: तुकडेबंदी कायद्यात झाली मोठी सुधारणा! आता करता येणार 5 गुंठ्यांच्या जमीनीचीही खरेदी-विक्री..

land record update महाराष्ट्र सरकारने तुकडेबंदी कायद्यामध्ये मोठी सुधारणा केली असून यानुसार आता 5 गुंठे एवढ्या जमिनीची सुद्धा खरेदी-विक्री करता येणे शक्य आहे. यापूर्वी, जिरायत जमिनीसाठी 80 गुंठे तर बागायत जमिनीसाठी 20 गुंठे एवढे क्षेत्र जमिनीच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध लावलेले होते.

land record update

कुळवहिवाट कायदा व महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) कलम १९६१तील तरतुदींच्या अधीन आणि नियमातील शर्तीच्या अधीन राहून आता ५ गुंठे जमिनीच्या खरेदी-विक्री करण्याची परवानगी देण्याचा अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना बहाल करण्यात आला आहे. land record update

शासनाचा GR पाहण्यासाठी क्लिक करा

मात्र किमान क्षेत्र जमिनीपेक्षा कमी जमिनीची खरेदी-विक्री करण्याकरिता जिल्हाधिकारी किंवा प्रातांधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची मात्र मोठी पंचाईत झाली आहे. त्या निर्णयामध्ये बदल प्रस्तावित असून त्या निर्णयात अद्याप बदल झालेला नाही.

अनेक शेतकऱ्यांना विहिर घेण्यासाठी/रस्त्यासाठी/वैयक्तिक घरकुल घेण्यासाठी किमान क्षेत्र जमिनीची खरेदी-विक्री करता येत नसल्याचा पार्श्वभूमीवर राज्य शासनाने १४ जुलै रोजी राजपत्र (GR) प्रसिद्ध केले आहे.

त्याप्रमाणे विहिरी घेण्यासाठी कमाल दोन गुंठ्यापर्यंत जमिनीचे हस्तांतरण मंजूर करण्याचा अधिकार हा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांचा मंजुरीचे आदेश हे विक्री दस्तासोबत जोडणे अनिवार्य आहे. अशा जमिनीच्या विक्री दस्त केल्यानंतर ‘विहीर वापरासाठी मर्यादित’ याप्रकारची नोंद शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर शेरा म्हणून केली जाईल. land record update

(GR) राजपत्रातील ठळक बाबी… (land record update)

  • शेत रस्त्याकरिता जमीन हस्तांतरित करण्याच्या अर्जाबरोबरच प्रस्तावित शेतरस्त्याचा कच्चा नकाशा आणि ज्या जमिनीवर रस्त्याचा नकाशा प्रस्तावित आहे, त्या जमिनीचे भू-सहनिर्देशक व जवळचा विद्यमान रस्ता जेथे प्रस्तावित रस्ता जोडणार असेल, त्याचा तपशील नमूद करावा लागणार आहे.
  • जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज आल्यावर ज्या जमिनीवर शेत रस्ता हा प्रस्तावित आहे त्यासंबंधीचा अहवाल तहसीलदारांकडून मागविण्यात येईल. त्या आवाहलाची पडताळणी झाल्यानंतरच शेत रस्त्यासाठी संबंधित शेतजमिनीचे हस्तांतरण करण्यास मंजुरी मिळेल.
  • जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरी आदेशामध्ये शेत रस्त्याकरिता हस्तांतरित करण्यात येणाऱ्या प्रस्तावित जमिनीच्या भू-सहनिर्देशकाचा सुद्धा समावेश असेल. जिल्हाधिकाऱ्यांचा मंजुरी आदेश जमिनीच्या विक्री दस्तासोबत जोडावा लागणार आहे.

शासनाचा GR पाहण्यासाठी क्लिक करा

  • तसेच अर्जाबरोबरच जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर सार्वजनिक प्रयोजनाकरिता भूसंपादन अथवा थेट खरेदी केल्यावर शिल्लक प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र जमिनीच्या हस्तांतरणाच्या अर्जाबरोबरच भूसंपादनाचा अंतिम निवाडा अथवा कमी-जास्त पत्र जोडण्यात येणार आहे. (GR) राजपत्रातील ठळक बाबी… land record update
  • वैयक्तिक लाभार्थ्यांकरिता केंद्रीय अथवा ग्रामीण घरकूल योजनेकरिता आवश्यक जमिनीच्या हस्तांतरणासाठी मंजुरी देण्यापूर्वी जिल्हा ग्रामीणविकास अधिकाऱ्यांकडून लाभार्थीची खात्री झाल्यावर प्रत्येक लाभार्थीला ५०० चौरस फुटापर्यंतच्या जमिनीचे हस्तांतरण करण्यास मंजुरी मिळणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी ही एक वर्षासाठीचीच

विहीर/शेत रस्ता/व्यक्तीगत लाभार्थ्यांकरिता केंद्र अथवा राज्य ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या प्रयोजनाकरिता जमिनीच्या हस्तांतरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी ही मात्र एक वर्षासाठीच राहणार असून अर्जदाराच्या विनंतीवरून पुढील दोन वर्षाकरिता मुदतवाढ देण्यात येणार आहे. या काळामध्ये प्रयोजनाप्रमाणे कार्यवाही होने अपेक्षित आहे, नसता तो आदेश रद्द करण्यात येणार आहे. land record update

आवश्यक कागदपत्रे (GR) राजपत्रातील ठळक बाबी… land record update

● विनंतीपत्र
● विक्रेता आणि खरेदीदारांची ओळखपत्रे
● 7/12 उतारा
● 8-अ आकाराची नक्कल
● शुल्क

तुमच्या जमिनीचा नकाशा घरबसल्या मोफत डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.

लेक लाडकी योजनेबद्दल जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

Similar Posts