Lightning Alert App : पावसाळ्यामध्ये वीज पडण्यापूर्वी 15 मिनिटं आगोदर ‘या’ ॲपद्वारे मिळणार माहिती..

पावसाळ्यात जुन व जुलै महिन्यात वीज पडून (Lightning Strikes) जिवीत व वित्त हानी होत असल्याच्या घटना नेहमी घडतात, वीज पडून जीवीत हानी, पशू हनी होऊ नये याकरीता प्रतिबंधात्मक उपयायोजना म्हणून भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयद्वारे एक ॲप तयार करण्यात आले असून या ॲपचे नाव ‘दामिनी’ ॲप असे आहे. हे ॲप Google play स्टोअरवर उपलब्ध आहे. आणि या ॲप्लिकेशन च्या सहाय्याने तुम्हाला वीज पडण्याच्या 15 मिनिटाआगोदर या ॲपमध्ये विज पडण्याची स्थिती दर्शविण्यात येते. त्यामुळे तुमच्या आसपास वीज पडण्याची शक्यता असल्यास त्याची माहिती तुम्हाला 15 मिनिटापूर्वीच मिळते.

जीवितहानी टाळण्यास मदत होईल…

मागील दिवसात झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून अनेक नागरिकांचा जीव गेला. विशेषत: मान्सुनच्या कालावधीमध्ये वीज पडून जिवीत हानी होण्याच्या घटना सर्वाधिक घडतात. मात्र दामिनी एप्लिकेशन्स डाऊनलोड केल्यास सध्या तुम्ही असलेल्या परिसरामध्ये वीज पडण्याची शक्यता असल्यास याची माहिती 15 मिनिटापूर्वी तुम्हाला मिळते. त्यामुळे तुम्हाला सुरक्षित ठिकाणी जाऊन जीवितहानी टाळता येऊ शकते.

कसे काम करते Damini Lightning Alert App

दामिनी ॲप GPS LOCATION द्वारे काम करीत असून, वीज पडण्यापूर्वी 15 मिनिटे आगोदरच या Damini Lightning Alert App मध्ये त्याची स्थिती दर्शविण्यात येते. आपल्या ॲपमध्ये आपल्या आसपास वीज पडण्याची शक्यता असल्यास त्या ठिकाणापासुन सुरक्षीत स्थळी जावे, कोणत्याही झाडाचा आश्रय घेऊ नये. त्यासाठी हे Damini Lightning Alert App सामान्य नागरिकांना डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करण्याबाबतच्या सूचना उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी मुख्याधिकारी यांनी आपआपल्या स्तरावरुन निर्गमित करव्याचा अशा सूचना जालना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या असून नागरिकांना दामिनी ॲप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करण्याचे व हे ॲप कसे वापरावे याची माहिती देऊन त्याबाबतच्या अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

पावसाळ्यात सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व पोलीस पाटील, शासकीय यंत्रणा, नागरीक क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी अव्वल कारकुन, शासकीय अधिकारी-कर्मचारी, आरोग्य सेवक, महसुल सहायक, गांव स्तरावरील सरपंच, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत डाटा एंट्री ऑपरेटर यांनीही हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्याचे आदेश जालना जिल्हा प्रशासनाने दिले आहे. शिवाय गावामधील सर्व स्थानिय सरकारी अधिकारी-कर्मचारी यांनी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करुन त्यात मिळणाऱ्या अलर्टनुसार आवश्यक त्या पुर्वसूचना गावामधील सर्व नागरीकांना देऊन संभाव्य होणारी जीवितहानी टाळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) श्री केशव नेटके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!