Mera Bill Mera Adhikar: मात्र 200 रुपयांची खरेदी करा अन् 1 कोटी रुपये जिंका; जाणून घ्या या सरकारी योजनेबद्दल…!
Mera Bill Mera Adhikar: जर कोणी तुम्हाला म्हटले की, तुम्ही फक्त 200 रुपयांच्या खरेदीवर 1 कोटी रुपयांपर्यंतचे रोख बक्षीस जिंकू शकतात तर तुम्हाला खरे वाटेल का? पण ही 100 % सत्य असून सरकार 1 सप्टेंबरपासून ‘मेरा बिल मेरा अधिकार’ नावाची जीएसटी योजना सुरू करत आहे.
या सरकारी योजनेअंतर्गत तुम्हाला 200 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीच्या कोणत्याही वस्तू अथवा सेवा घेतल्यावर त्याचे GST बिल अपलोड करावे लागेल आणि त्यावर रोख बक्षीस जिंकण्याची संधी आहे.
हे GST बिल प्रोत्साहन योजना केंद्र सरकारने राज्य सरकारांच्या साहाय्याने सुरू केली असून ग्राहकांनी प्रत्येक खरेदीसाठी बिल/जीएसटी इनव्हॉइस मागण्याची सवय लावणे हाच यामागील एकमेव उद्देश आहे.
ही योजना 1 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणार असून सर्वप्रथम ही योजना आसाम, गुजरात आणि हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी, दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव या राज्यांमध्ये सुरू केली जाईल.
GST पुरवठादारांकडून (आसाम, गुजरात आणि हरियाणा आणि पुद्दुचेरी, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत) ग्राहकांना जारी केलेले सर्व B2C बिल या योजनेअंतर्गत पात्र असतील. लक्षात ठेवा इनव्हॉइसचे किमान मूल्य रु. 200 आहे.
बिल कसे अपलोड करायचे Mera Bill Mera Adhikar
ग्राहकांना त्यांचे बिल iOS आणि Android वर उपलब्ध असलेल्या ‘मेरा बिल मेरा अधिकार’ या मोबाईल ॲप्लिकेशनवर बरोबरच वेब पोर्टल ‘web.merabill.gst.gov.in‘ वर GST इनव्हॉइस अपलोड करता येईल.
एक ग्राहकाला एका महिन्यात कमाल 25 बिल अपलोड करता येईल, प्रत्येक अपलोड केलेल्या चलनाला एक पावती संदर्भ क्रमांक (ARN) मिळेल जो बक्षीसासाठी वापरला जाईल.
इनव्हॉइस बिल अपलोड करताना, ग्राहकाला पुरवठादाराचा/दुकानाचा जीएसटीआयएन, इन्व्हॉइस नंबर, इनव्हॉइस तारीख, इनव्हॉइस व्हॅल्यू आणि ग्राहकाचे राज्य/केंद्रशासित प्रदेश यासारखे तपशील देणे गरजेचे आहे..
विजेत्यांना ही कागदपत्रे दाखवावी लागतील
अर्थ मंत्रालयाने या बाबत माहिती देताना म्हटले आहे की, ज्या विजेत्यांना बक्षीस मिळेल त्यांना पॅन नंबर, आधार कार्ड, बँक खात्याचे तपशील ‘मेरा बिल मेरा अधिकार’ App वर अपलोड करावे लागतील. ही सर्व माहिती बक्षीस जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत देणे आवश्यक आहे.