Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana | मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना, रुग्णालय उपचारासाठी 3 लाख रुपये मिळणार

Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana

Government Scheme: देशात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. कोरोना काळात अनेकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कोरोनाच्या भीतीने अनेकांना लुटले देखील गेले. कोरोना काळात कोरोना काळात हॉस्पिटलमधील लाखों रुपयांची बिले पाहून डोळे पाढंरे होण्याची वेळ आली होती.

कोरोना महामारीतून माणूस वाचावा, यासाठी अनेकांनी घरदार गहाण ठेवून किंवा कर्ज काढून रुग्णालयात उपचार केले. त्यानंतर आरोग्य विमा काढणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र, तरीही सर्वसामान्य माणूस अजूनही आरोग्य विमा योजनेपासून दूरच असल्याचे दिसते.

परंतु, आरोग्य विमा सेवा देणाऱ्या कंपन्यांचा नागरिकांना खर्च देखील परवडत नाही, अशी काहींची परिस्थिती आहे. देशात अनेक जणांकडे दवाखाना करण्यासाठी पैसे नसतात. यामुळे ते दवाखाना करू शकत नाही. मात्र, तुम्हाला उपचारासाठी सरकार अनुदान देत आहे.

government scheme राज्य व केंद्र सरकार जनतेच्या हितासाठी व आरोग्यासाठी विविध योजना राबवत असते. यामध्ये राज्य सरकार खास योजना चालवत आहे. ही योजना दवाखान्याच्या उपचारासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेची अंमलबजावणी शिंदे सरकार पाहत आहे.

या योजनेचं नाव ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना’ (Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana) असं आहे. या योजनेअंतर्गत रुग्णालयात उपचारासाठी 3 लाख रुपये मदत मिळणार आहे. या योजनेमुळे गरजूंना मदत होणार आहे. या योजनेची संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेबाबत..
मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केली होती. पुन्हा शिंदे सरकारने ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गरजू लोकांना उपचारासाठी 3 लाख रुपये मदत दिली जाणार आहे. ही योजना सामान्य व गरजू नागरिकांसाठी आहे.

mukhyamantri sahayata nidhi महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, राष्ट्रीय बालक स्वस्थ कार्यक्रम, धर्मदाय रुग्णालय यामध्ये रुग्ण लाभ घेत असेल तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेचा लाभ घेता येणार नाही. तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

योजनेसाठी महत्वाच्या बाबी
1) आधार कार्ड
2) पत्ता
3) ई-मेल आयडी
4) मोबाईल नंबर
5) रुग्णांची नातेवाईकांची नावे (mukhyamantri sahayata nidhi form)

असा करा ऑनलाईन अर्ज
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी mahacmmrf.com या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. अर्जात विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरून सबमिट बटणावर क्लिक करा. तुमचा प्रस्ताव मांडल्यानंतर पडताळणी करून तुम्हाला आर्थिक मदत दिली जाईल.


हे देखील वाचा –


Similar Posts