मांत्रिकाने तीर्थ म्हणून काळ्या चहातून विष देत म्हैसाळमधील वनमोरे कुटुंबातील 9 जणांना संपवलं..

सांगली जिल्ह्यामधील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटुंबामधील 9 जणांनी सामूहिक आत्महत्या केली नसून ते एक हत्याकांड असल्याचे समोर आल्यानंतर पुन्हा एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी मांत्रिक अब्बास मोहम्मद अली बागवान (वय वर्षे 48 रा. सोलापूर) आणि धीरज चंद्रकांत सुरवशे (वय 39 रा. सोलापूर) यांना अटक केलेली आहे.

दरम्यान, मांत्रिकाने काळ्या चहमधून विष ददेऊन वनमोरे कुटूंबाला संपवलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 19 जून 2022 ही गुप्तधन मिळण्याची डेडलाईन ठरलेली होती. या दिवशी तुम्हाला गुप्तधन मिळेलच असं वनमोरे कुटूंबाला भुलवून मांत्रिकाने त्या 9 जणांना वेगवेगळ्या खोलीत थांबण्यास सांगितले होते.

लाईट बंद करून काळ्या चहातून दिले विष.

त्यानंतर त्या मांत्रिकाने घरातील लाईट बंद करण्यास सांगितली, आणि लाईट बंद केल्यावर त्याने त्या सर्वांना काळ्या चहामधून विष देऊन त्यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झालं आहे.

पूर्वी शिक्षक असललेल्या पोपट वनमोरे, त्यांच्या पत्नी वनमोरे, मुलगी यांना हा काळा चहा दिला. त्याच्या नंतर पोपट यांचा मुलगा शुभमला घेऊन पशु डॉक्टर असलेल्या माणिक वनमोरेच्या घरी आल्यावर तिथे माणिक वनमोरे, त्यांची आई, पत्नी, दोन्ही मुले आणि शुभमला चहा दिला. हे सगळे मयत झाल्याची खात्री पटल्यावर आरोपींनी पहाटे 5 वाजता म्हैसाळमधून पळ काढत सोलापूर गाठले.

एका आरोपीला 7 जुलै 2022 पर्यंत पोलिस कोठडी

अटक करण्यात आलेल्या आरोपी नामे धीरज याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र, अब्बासला अटकपूर्व वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता छातीमध्ये दुखत मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आहे. त्यास डिस्चार्ज मिळताच त्याला सुद्धा अटक करून पुढील तपास केला जाणार आहे.

सायनाइडपेक्षाही तीव्र विष; चव गंध आणि रंगहीन

वनमोरे कुटुंबीयांना देण्यात आलेले हे विष सायनाइडपेक्षाही अधिक तीव्र असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. या कुटुंबीयांतील नऊ सदस्यांचा मृत्यू 20 जून रोजी झाला होता. प्रथम हा प्रकार हा सामुदायिक आत्महत्येचा असावा, असे पोलिसांना वाटले होते. परंतु अधिक तपास केल्यानंतर या सदस्यांचा मृत्यू हा अंधश्रद्धेतून झालेल्या घात-पाताने करण्यात आला, असे तपासात निष्पन्न झाले आहे. हे विषारी औषध चव, वास व रंगहीन असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!