प्रेमात अडथळा ठरणाऱ्या आईची प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने अल्पवयीन मुलीने केली हत्या..

बाळापूर शिवारामध्ये आईला शेतामध्ये बोलावून 12 वर्षाच्या मुलीने आईचा गळा चिरून हत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आल्यामुळे औरंगाबादमध्ये खळबळ उडाली.

पोलिसांनी 12 तासांच्या आत हत्येचा उलगडा करून मारेकरी प्रियकर आणि त्याच्या मित्राला अटक करून दोन विधीसंघर्षग्रस्त मुलींना सुद्धा चौकशीसाठी बालसुधारगृहात पाठवले.

प्रियकरा बरोबर लग्न करण्यासाठी आपल्या जन्मदात्या आईची हत्या करण्याचे धाडस कसे झाले असावे, या विचारात असलेल्या पोलिसांना अल्पवयीन मुलीने केलेले एक वक्तव्य धक्का देणारे ठरले.

आरोपी अल्पवयीन मुलीचे बेफाम वक्तव्य?

आईची हत्या करून मुलीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिला विचारले की, तू जे केलेस त्याचे परिणाम माहिती आहेत का? यावर उत्तर देताना मुलीने निर्लज्जपणे म्हटले, ‘त्यात काय एवढे? तो तुरुंगातून बाहेर आला की आम्ही लग्न करू’.. मुलीचे हे वक्तव्य ऐकून तिथे उपस्थित पोलिसांना धक्काच बसला.

सविस्तर माहिती अशी की, सोमवारी आठ वाजता बाळापूर शिवारामध्ये सुशीला संजय पवार वय 39 वर्षे या महिलेचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला.

पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर अधीक्षक डॉ. पवन बनसोड, उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांच्या बरोबर सायबर पोलिसांनी तपास केला असता, त्यांच्या समोर आलेली माहिती अशी की,

नवऱ्याच्या निधन झाल्यानंतर सुशीला त्यांच्या दोन मुले आणि एकुलत्या एक लेकीसोबत शिवाजीनगरामध्ये हातगाडीवर भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करीत होत्या.

त्यांना 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या प्रेम प्रकरणाबद्दल कळाल्यावर सुशीला यांनी मुलगी आणि प्रियकराला चांगलेच धारेवर धरले होते. याचाच राग मनात धरून मुलीने प्रियकराच्या मदतीने आईचा गळा कापला. सुशीला यांचा खून करण्याची योजना चार दिवसांपूर्वी आखली असल्याची आरोपींनी सांगितलं.

पोलिसांनी प्रियकर दीपक बचाटे वय 24 वर्षे, त्याचा मित्र सुनील मेहरला न्यायालयाने 13 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!