पेट्रोल भरून विना पैसे देताच पळून जाताहेत वाहनचालक; व्हिडिओ व्हायरल..

बुलडाणा: पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाहने चालवणे कठीण झाले आहे बुलडाणा जिल्ह्यामध्ये मागील दोन महिन्यापासून ग्राहक पेट्रोल भरून विना पैसे देताच पळून जाण्याचा या घटनांमुळे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यां मध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे.

मागील दोन महिन्यापासून बुलडाणा जिल्ह्यामधील विविध पेट्रोल पंपांवर वाहन धारक पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना गाडीची टाकी फूल करायला सांगतात आणि टाकी फुल झाल्यावर पैसे न देताच ते भरधाव वेगाने निघून जाण्याचा प्रकार दोन महिन्यापूर्वी शेगाव येथील बाबजी पेट्रोल पंप व गजानन सर्विस सेंटर येथे घडला असून त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

शेगाव मध्ये कारमध्ये बसलेल्या काही व्यक्तींनी पेट्रोल पंपावर जाऊन कारची टाकी फुल करून घेतली अन् पैसे न देताच तेथून पोबारा केला. त्यानंतर नांदुरा, खामगाव आणि आंबे-टाकळी अशा विविध ठिकाणी असा प्रकार घडल्याचं समोर आलंय.

पाहा व्हिडिओ..

पेट्रोल पंपावर गाडीची टाकी फुल करून पलायन केला जातो. गाडीमध्ये बसलेल्या व्यक्तींच्या तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने त्यांना आजपर्यंत कुणीही ओळखलेले नाही. मात्र हे गुन्हेगारी स्वरूपाचे लोक असावेत आणि गुन्ह्यात ही कार वापरली जात असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.

Similar Posts