भारतीय कृषी संशोधन संस्थेत 462 पदांसाठी भरती सुरू, पगार 44000 पेक्षा जास्त असेल, जाणून घ्या अर्ज कसा करावा..

भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) ने भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि त्यांच्या संस्था (रेजिनल स्टेशन्ससह) च्या वतीने सहाय्यक पदाच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 7 मे पासून सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 1 जून आहे.

जाहिरात क्र.: 2-1/2022/Rectt.cell/Administrative (CBT)

ICAR-IARI भरती रिक्रुटमेंट रिक्त जागा : 462 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे त्यापैकी 71 रिक्त जागा सहाय्यक ICAR मुख्यालयाच्या पदासाठी आहेत आणि 391 रिक्त जागा सहाय्यक ICAR संस्थांच्या पदांसाठी आहेत.

ICAR-IARI भर्ती शैक्षणिक पात्रता:
• उमेदवार मान्यताप्राप्त महाविद्यालयातून पदवीधर असावेत.

ICAR-IARI भरती वयोमर्यादा:
• 1 जून 2022 रोजी उमेदवारांचे वय 20 ते 30 वर्षे दरम्यान असावे.

निवड कशी होईल ?
• निवड लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

पगार किती मिळेल ?
• ICAR IARI असिस्टंट रिक्रूटमेंट 2022 अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना चांगला पगार दिला जाईल. ICAR संस्थेसाठी निवडलेल्या उमेदवारांना 35,400 रुपये आणि ICAR मुख्यालयासाठी उमेदवारांना 44,900 रुपये दिले जातील.

अर्ज शुल्क :
• General/OBC/EWS: ₹1200/-
• [SC/ST/ExSM/PWD/महिला: ₹500/-]

ICAR-IARI भर्ती: अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या

• पात्र उमेदवार IARI अधिकृत वेबसाइट www.iari.res.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

● अधिक तपशिलांसाठी उमेदवारांनी IARI iari.res.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी


महत्वाच्या सूचना:-
● वरील पदांच्या संख्येमध्ये बदल करण्याचा किंवा पदभरती रद्द करण्याचा अधिकार संस्थेने राखून ठेवला आहे.

● उमेदवार हा भारतीय नागरिक असावा.
पदभरती संदर्भात इतर माहितीसाठी या वेबसाईटवर पाहू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!