पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी; ‘या’ तारखेला येणार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे..
PM Kisan योजनेचे लाभार्थी शेतकरी 11व्या हप्त्याची अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. पण शेतकऱ्यांच्या वतीने ई-केवायसीच्या प्रक्रियेला विलंब होत असल्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा लांबत चालली आहे. सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 मे 2022 निश्चित केली आहे. जर काही शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई-केवायसी केले नसेल, तर लवकरात लवकर पूर्ण करा.
PM Kisanच्या 11व्या हप्त्याच्या ताज्या अपडेट-नुसार, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार असून 11 वा हप्ता 31 मे रोजी खात्यात वर्ग केला जाईल. हस्तांतरणाच्या या विनंतीवर राज्य सरकारांनी स्वाक्षरी केली असून यानंतर फंड ट्रान्सफर ऑर्डर (FTO) जनरेट होईल व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील.
1 एप्रिल ते 31 जुलैच्या दरम्यान 11व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करायचे आहेत. याकरिता 80 टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी पूर्ण केली आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता केंद्र सरकारकडून दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. हे पैसे 2,000 रुपयांच्या हप्त्यांमध्ये वर्षातून तीन वेळेस दिले जातात. आतापर्यंत 10 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले असून मागील वर्षीच्या तुलनेत यावेळेस हप्ता उशिरा येणार आहे. पंतप्रधान किसान योजने-अंतर्गत देशभरातील 12.5 कोटींहून अधिक शेतकरी नोंदणीकृत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल त्यांच्या खात्यात 2000 रुपये येणार नाहीत.
ई-केवायसी ऑनलाइन करण्याची प्रक्रिया
▪️सर्वप्रथम PM किसान वेबसाइट https://pmkisan.gov.in/ ओपन करा.
▪️येथे ‘फार्मर्स कॉर्नर’ मधील ई-केवायसी वर क्लिक करा.
▪️आता उघडलेल्या वेबपेजवर आधार क्रमांक टाका आणि सर्च टॅबवर क्लिक करा.
▪️यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तो टाका.
▪️ओटीपी टाकल्यानंतर तो सबमिट करा.
असा चेक करा आलेला निधी
पैसे खात्यावर वर्ग झाले की नाही, याची माहिती चेक करता येते.
▪️त्याकरिता pmkisan.gov.in जावे.
▪️‘Farmer Corner’वर क्लिक केल्यास दोन पर्याय समोर येतील.
▪️आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून पैसे जमा झाले की नाही, हे तपासू शकता.