उद्या औरंगाबाद शहरात राहणार पोलिसांचा तगडा बंदोबस्त
उद्या दिनांक ४ मे रोजी औरंगाबाद शहरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे त्याचे कारण म्हणजे मनसेचे आंदोलन या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चांगलीच खबरदारी घेतलेली आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू नये यासाठी उद्या 3 डीसीपी, 3 एसीपी, 39 पी आय, 130 ए पी आय-पी एस आय आणि 1248 स्टाफ नेमलेला आहे. त्यासोबत शहरातील 42 मशिद जवळ 28 ए पी आय- पी एस आय आणि 154 आर्म गार्ड नेमलेले आहेत. महत्त्वाच्या आणि अतिमहत्वाच्या शहरातील 38 ठिकाणी अधिकारी आणि आर्म गार्ड नेमलेले आहेत.
तर 17 पोलीस स्टेशनच्या हद्दीत पीटर मोबाईल , सेकंड , थर्ड मोबाईल, बीट मार्शल , 112 , Pcr द्वारे शहरातील संवेदनशील परिसरात 24 तास पेट्रोलिंग करणार आहेत. तर या व्यतिरिक्त क्राइम ब्रांच, सायबर सेल, कमांड अँड कंट्रोल सेंटर द्वारे शहरातील समाजकंटक आणि गुंड यांच्यावर, शहरातील आणि हालचालीवर विशेष लक्ष ठेवणार आहेत. या व्यतिरिक्त देखील शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी एस आर पी एफ आणि रिओट कंट्रोल पार्टी देखील तैनात केलेली आहे.
औरंगाबाद शहर पोलीस शहराची सार्वजनिक शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सज्ज असून नागरिकांनी पोलिसांना मदत करावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे…