शेअर बाजारात ब्लॅक मंडे, गुंतवणूकदार आडवे; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल सात लाख कोटींचा चुराडा..

भारतीय शेअर बाजारासाठी आजचा सोमवार हा खऱ्या अर्थाने ब्लॅक मंडे ठरला. शेअर बाजारामध्ये आज मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. आज एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल सात लाख कोटींचा चुराडा झाला आहेत. दलाल स्ट्रीटवर सेन्सेक्समध्ये आज सुमारे तीन टक्क्यांची मोठी घसरण झाली असून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांकरीता हा मोठा धक्का असल्याचं दिसून आलंय.

अमेरिकेमध्ये महागाईच्या उच्चांकाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम.

अमेरिकेला मागील 40 वर्षांमधील सर्वाधिक महागाईला तोंड द्यावे लागत असून अमेरिकेची महागाई तब्बल 8.6 टक्क्यांवर पोहोचलेली आहे. या वाढत्या महागाईला नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

फेडरल बँकेकडून व्याज दरात वाढ होण्याची शक्यता.

अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हकडून 14 आणि 15 जून 2022 दरम्यान बैठक होणार असून या बैठकीमध्ये 75 बेसिस पॉईन्टसच्या व्याज दरवाढीचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. या पूर्वी 50 बेसिस पॉईन्टसच्या व्याज दरवाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि या पार्श्वभूमीवर अनेक परदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारामधून आपली गुंतवणूक काढत असून सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी शेअरची विक्री करत आहेत.

डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला..

डॉलरच्या तुलनेत आजसुद्धा रुपयाची घसरण झालेली आहे. शुक्रवारी 77.84 रुपयाच्या तुलनेत आज रुपयाची किंमत 78.28 रुपयांवर पोहोचली असून रुपयाची ही आतापर्यंतची सर्वात निचांक्क पातळी आहे. त्यामुळे एका डॉलरसाठी आता 78.28 रुपये मोजावे लागणार आहेत. परदेशी गुंतवणूकदार करत असलेली विक्री आणि अमेरिकेतील महागाईचा दर यामुळे एका डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे.

आरबीआयकडून रेपो रेटमध्ये वाढ

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मागील आठवड्यामध्ये नवीन रेपो रेट जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ केली होती. सध्या रिझर्व्ह बँकेचे प्रमुख लक्ष्य महागाईवर नियंत्रण मिळवण्यावर असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले. आरबीआयच्या RBI नव्या पतधोरणानुसार आता रेपो रेट 4.90 टक्के इतका झालेला आहे. त्यामुळे आता कर्ज महागणार असून ईएमआय सुद्धा वाढणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!