खुशखबर..! पोलिस भरतीचा ‘जीआर’ जारी..
Police Physical Exam GR 2022..
राज्याचे राजकारण तापलेले असताना, राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी असून राज्यात तब्बल 7231 जागांसाठी पोलिस भरती (Police recruitment) होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज (ता. 28) या पोलिस भरतीला मंजुरी दिली. तसा ‘GR’ (शासन निर्णय) जारी करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
पोलीस भरती 2022 मैदानी चाचणी :-
महाराष्ट्र पोलीस भरती लवकरच सुरु होणार असून पोलीस भरती ची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला एकच प्रश्न भेडसावत होता, आणि तो म्हणजे प्रथम शारीरिक चाचणी (Physical Test) होणार, की लेखी चाचणी होणार?
दि. 24 जून 2022 रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र (GR) जाहीर केले आहे आणि त्या मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2022 बाबत भरती प्रक्रिया राबवने बाबत राजपत्र (GR) काढले आहे. खालील चार्ट मध्ये दर्शवल्या प्रमाणे 2022 महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये प्रथम शारीरिक चाचणी होणार आहे आणि त्या मध्ये मुख्यतः 03 इव्हेंट राहणार आहेत. Police recruitment
1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळा फेक असे 50 गुणांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. आपणास खालील टेबल मधून सहज समजेल.
वरील प्रमाणे 2022 महाराष्ट्र पोलीस भरती घेण्यात येईल. उमेदवाराने वरील प्रमाणेच मैदानी चाचणीची तयारी सुरू करावी आणि जास्तीत जास्त लेखी परीक्षेच्या तयारीला द्यावा.
2022 पोलीस भरती महिला मैदानी चाचणी :-
महिला उमेदवारांची शारीरिक चाचणी संबंधित टेबल खाली दिलेला आहे. महिलांनी सुध्दा ययाप्रमाणेच आपली तयारी करायला पाहिजे.
महिला उमेदवार मैदानी चाचणी एकूण 03 इवेंट होतील :
पोलीस भरती 2022 च्या मैदानी चाचणी ची रूपरेषा स्पष्ट झाली आहे उमेदवारांनी लेखी परीक्षेला प्राधान्य देऊन आपला सराव सुरू करावा
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 पुरुष मैदानी चाचणी गुण:-
पुरुष उमेदवार मैदानी चाचणी एकूण 03 इवेंट होतील :
आता पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीची रूपरेषा आता स्पष्ट झाली आहे उमेदवारांनी लेखी परीक्षेला प्राधान्य देऊन आपला सराव सुरू करावा.
महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बलातील ‘सशस्र पोलिस शिपाई’ (पुरूष) पदासाठी 100 गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे.
▪️5 किमी धावणे- 50 गुण
▪️100 मीटर धावणे -25 गुण
▪️गोळाफेक – 25 गुण
शारीरिक चाचणीत किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार पदानुसार 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील. नंतर उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे..
पुरुष उमेदवारांसाठी मैदानी चाचणीच्या गुणांची विभागणी इव्हेंट निहाय पुढील प्रमाणे करण्यात आली आहे:- Police recruitment
👉🏻 पुरुष उमेदवार 1600 मीटर धावणे या इव्हेन्ट करिता गुणांचे विभाजन पुढील प्रमाणे:- Police recruitment
▪️5.10 च्या आत 20 मार्क्स राहतील
▪️5.10 ते 5.30=15 मार्क्स
▪️5.30 ते 5.50=12 मार्क्स
▪️5.50 ते 6.10=10 मार्क्स
▪️6.10 ते 6.30=08 मार्क्स
▪️6.30 ते 6.50=04 मार्क्स
▪️6.50+…. =00 मार्क्स
👉🏻 पुरुष उमेदवार “गोळा फेक” इव्हेंट मध्ये गुणांचे विभाजन पुढील प्रमाणे राहील:- Police recruitment
▪️8.50+… =15 मार्क्स राहातील
▪️8.50 ते 7.90 =12 मार्क्स
▪️7.90 ते 7.40 =09 मार्क्स
▪️7.40 ते 6.90 =06 मार्क्स
▪️6.90 ते 6.40 =03 मार्क्स
▪️6.40 पेक्षा कमी=00 मार्क्स
👉🏻 100 मीटर धावणे या इव्हेन्ट करिता गुणांचे विभाजन पुढील प्रमाणे:- Police recruitment
▪️11.50 पेक्षा कमी =15 मार्क्स राहतील
▪️11.50 ते 12.50 = 12 मार्क्स
▪️12.50 ते 13.50 = 09 मार्क्स
▪️13.50 ते 14.50 = 06 मार्क्स
▪️14.50 ते 15.50 = 03 मार्क्स
▪️15.50+…. = 00 मार्क्स
पोलीस भरती 2022 महिला उमेदवार करिता मैदानी चाचणीच्या गुणांची विभागणी इव्हेंट निहाय पुढील प्रमाणे करण्यात आली आहे:-
💁🏻♂️ 800 मी धावणे इव्हेंट च्या गुणांचे विभाजन पुढील प्रमाणे:-
▪️2.50 च्या आत..= 20 मार्क्स राहतील
▪️2.50 ते 3.00 = 15 मार्क्स
▪️3.10 ते 3.10 = 10 मार्क्स
▪️3.10 ते 3.20 = 06 मार्क्स
▪️3.20 ते 3.30 = 02 मार्क्स
▪️3.30+… = 00 मार्क्स
💁🏻♂️ “गोळा फेक” इव्हेंट मध्ये गुणांचे विभाजन पुढील प्रमाणे राहील:-
▪️6.00 मी+…. = 15 मार्क्स राहतील
▪️6.00 ते 5.50 = 11 मार्क्स
▪️5.50 ते 5.00 = 08 मार्क्स
▪️5.00 ते 4.50 = 05 मार्क्स
▪️4.50 ते 4.00 = 02 मार्क्स
▪️4.00 पेक्षा कमी = 00 मार्क्स
💁🏻♂️ 100 मीटर धावणे या इव्हेंट करिता गुणांचे विभाजन पुढील प्रमाणे:- Police recruitment
▪️14 सेकंदाच्या आत.. =15 मार्क्स राहतील
▪️14 ते 15 = 12 मार्क्स
▪️15 ते 16 = 09 मार्क्स
▪️16 ते 17 = 06 मार्क्स
▪️17 ते 18 = 03 मार्क्स
▪️18+…. = 00 मार्क्स
‘अशी’ होणार लेखी परीक्षा…!
● लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या विषयांवर आधारित असलेले प्रश्न असतील. हे प्रश्न बहुपर्यायी असतील.
● ही परीक्षा मराठी भाषेत होणार असून या लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल.
● उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणं अनिवार्य असून त्यापेक्षा कमी गुण मिळाल्यास उमेदवाराला अपात्र समजण्यात येतील.
● ही लेखी परीक्षा ‘ओएमआर’ (OMR- Optical Mark Recognition) पद्धतीने घेण्याकरीता शासनाने मान्यता दिलेली आहे.