लवकरच ७२३१ पदांसाठी पोलीस भरती होणार : दिलीप वळसे पाटील..

राज्यातील ७२३१ पदांसाठी पोलीस भरती येत्या काही दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली. राज्यातील ५२९७ पदांसाठी पोलीस भरती अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. काही ठिकाणी उमेदवारांना नियुक्ती आदेश जारी करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर, काही ठिकाणी मुलाखती सुरू आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत २०१९ ची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होईल, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

सध्या महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत कायदा आणि सुव्यवस्थेबाबत उत्तर दिले. दिलीप वळसे पाटील यांनी राज्य पोलीस विभागात पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.

येणाऱ्या काळात महाराष्ट्र पोलिसात कॉन्स्टेबलच्या ७२३१ जागांवर भरती सुरू होणार असून राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने या पोलीस भरतीला मान्यता दिली आहे. भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ दिला जाणार नसून ही भरती पारदर्शक पद्धतीने होणार आहे असेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.

पुढे बोलतांना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्य पोलीस दलातील ७२३१ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आणखी पदे भरण्यात येणार आहेत.

५२०० पदांची भरती अंतिम टप्प्यात

राज्यातील विविध पोलिस आयुक्त कार्यालये आणि जिल्हा पोलिस कार्यालयांतर्गत ५२०० पोलिस दलात हवालदारांची भरती सुरू झाली आहे. विविध जिल्ह्यांतील पोलीस भरती अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या काळात ५२०० पदांवर तरुणांना पोलीस हवालदार होण्याची संधी मिळणार आहे.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

दिलीप वळसे पाटील म्हणाले की, महाराष्ट्र पोलीस दलातील भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, ७२३१ पदे भरण्यात आली आहेत. दिलीप वळसे पाटील यांनी भरती प्रक्रियेत कोणताही अडथळा होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल असे सांगितले आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!