Pradhan Mantri Mudra Yojana in Marathi | मोदी सरकारकडून मिळणार 10 लाखांपर्यंत लोन, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
Pradhan Mantri Mudra Yojana in Marathi: अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो परंतु, आर्थिक स्थितीमुळे करू शकत नाही. स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि आर्थिक पाठबळ मिळत नसेल तर आता ही माहिती तुमच्यासाठी आहे. चला तर याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..
‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ असं या योजनेचे नाव असून या माध्यमातून आर्थिक साहाय्य केले जाते. बेरोजगार युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना 10 लाखांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते.
Pradhan Mantri Mudra Yojana प्रधानमंत्री मुद्रा योजनेबाबत…
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज उत्पादन, व्यापार आणि सेवांच्या माध्यमातून उत्पन्न नसलेल्या सूक्ष्म किंवा लघु उद्योगांना मिळते. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज ही मोदी सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांचे कर्ज मिळते.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेमार्फत तुम्हाला शिशू, किशोर व तरुण अशी तीन प्रकारची कर्जे दिली जातात. या योजनेअंतर्गत लोन मिळवण्यासाठी अर्जदाराला बॅंक किंवा कर्ज देणाऱ्या संस्थांना कोणतीही हमी व तारण देण्याची आवश्यकता नाही.
pradhan mantri mudra yojana जर तुम्ही पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेतले, तर कर्ज घेतल्यापासून 3 ते 5 वर्ष हा त्या कर्जाचा परतफेड कालावधी असेल. तसेच प्रक्रिया शुल्क किशोर आणि शिशु कर्जासाठी शून्य तर, तरुण कर्जाचा 0.5 टक्के रक्कम हे प्रक्रिया शुल्क वेगवेगळ्या बँकांनुसार आकारले जातात.
तीन प्रकारची मुद्रा कर्जे
शिशू – प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मंजूर होईल.
किशोर – प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर होईल.
तरुण – प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 5 लाख ते 10 लाखांपर्यंत कर्ज मंजूर होईल.
Pradhan Mantri Mudra Yojana कोणासाठी मिळते हे कर्ज..?
- लघु उद्योग व्यवसाय मालक
- फळ आणि भाजी विक्रेते
- पशुधन दुग्ध उत्पादक
- कुक्कुटपालन
- मत्स्यपालन
- विविध शेतीविषयक उपक्रमांची संबंधित दुकानदार
- कारागीर
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्ज नमुना
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- नोंदणी, परवाना किंवा प्रमाणपत्र (असल्यास)
योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज..
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. या दोन्ही पद्धती स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ या..
ऑनलाईन अर्ज..
सर्वप्रथम मुद्रा योजनेच्या https://www.mudra.org.in/ या वेबसाईटवर जा.
यानंतर होमपेजवर, लॉगिन बटणावर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल.
येथे तुम्हाला वापरकर्तानाव, संकेतशब्द आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
पुन्हा तुम्हाला लॉगिन बटणावर क्लिक करावे लागेल.
आता तुम्ही पोर्टलवर लॉगिन करण्यासाठी सक्षम असाल.
Pradhan Mantri Mudra Yojana ऑफलाईन अर्ज..
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे घेऊन जवळच्या बॅंकेत जावे लागेल.
- बँकेत गेल्यानंतर तुम्हाला या योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
- अर्ज घेतल्यानंतर, अर्जामध्ये विचारलेली माहिती भरा.
- अर्ज भरल्यानंतर, बॅंकेत सबमिट करा..
हे देखील वाचा-
घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
योजना सौर पॅनेल बसवा आणि २५ वर्ष मोफत वीज मिळवा.
1 KW सोलर लावायला काय खर्च येईल? त्यावर काय काय चालू शकते??