PVC Aadhaar card : तुमचे आधार कार्ड हरवले आहे का? फक्त 50 रुपयात मिळेल वॉटर प्रूफ Smart Aadhaar card..!

PVC Aadhaar card : बँक खाते उघडणे असो किंवा कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेणे असो, प्रत्येक कामासाठी आधार क्रमांक विचारला जातो. आधार कार्डचा वापर ॲड्रेस प्रूफ म्हणूनही केला जातो. याशिवाय मुलांच्या शाळेत प्रवेशासाठीही आधार कार्ड अनिवार्य आहे. 

PVC Aadhaar card
PVC Aadhaar card

खरं तर, बरेच लोक त्यांच्या खिशात आधार कार्ड ठेवतात. आता एवढा महत्त्वाचा आधार कार्ड जर कोठे हरवला तर टेन्शन येणे स्वाभाविक आहे. तसेच काही जण त्यांचे ओरिजनल आधार कार्ड फोल्ड करून खिशामध्ये ठेवतात. त्यामुळे पावसात भिजल्यानंतर खराब होण्याची भीती असते. 

तुम्हीही असेच करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, फक्त 50 रुपये खर्च करून तुम्ही क्रेडिट कार्डसारखे दिसणारे PVC Aadhar card मिळवू शकता, तेही नवीन पॉलीविनाइल क्लोराईड (PVC) कार्ड. जे तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये सहज कॅरी करू शकता. 

आधार कार्ड असलेल्यांना मिळणार 40 हजार रुपये

समजा जर का तुमचे आधार कार्ड कोठे गहाळ झाल्यास तुम्ही घरबसल्या मोबाईलवर दुसरे PVC Aadhar card ऑर्डर करू शकता. यासाठी फक्त 50 रुपये खर्च एवढा खर्च येतो, शिवाय त्या 50 रुपयांत स्पीड पोस्टचा खर्च सुद्धा समाविष्ट आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आता आधार कार्डचे पॉलिव्हिनाईल क्लोराईड (PVC) कार्ड जारी करत आहे. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला PVC Aadhar card कसे ऑर्डर करू शकता याची संपूर्ण माहिती देणार आहोत. 

How To Apply PVC Aadhaar card  

  • सर्वप्रथम, uidai ची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in उघडा 
  • त्यानंतर ‘My Aadhaar Section’ मध्ये ‘Order Aadhaar PVC Card’ वर क्लिक करा.  
  • तुम्ही Order Aadhaar PVC Card कार्ड वर क्लिक करताच, तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी EID या तिन्हीपैकी कोणतेही एक नंबर टाकावा लागेल. 
  • यानंतर खाली सुरक्षा कोड म्हणजेच कॅप्चा कोड टाका.  
  • यानंतर Send OTP वर क्लिक करा.  
  • त्यानंतर तुमच्या आधार लिंक असलेल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल.  

आधार कार्ड असलेल्यांना मिळणार 40 हजार रुपये

  • ओटीपी टाकल्यानंतर सबमिट बटणवर क्लिक करा.  
  • त्यानंतर स्क्रीनवर PVC Aadhaar card प्रिव्ह्यू कॉपी दिसेल. ज्यामध्ये तुमच्या आधारशी संबंधित तपशील असतील.
  • जर का तुमचा मोबाईल नंबर आधार डेटाबेसमध्ये नोंदणीकृत नसेल तर विनंती OTP समोर दिलेल्या संबंधित पर्यायावर क्लिक करा.  
  • या पर्यायाची निवड केल्यानंतर, दुसरा नवीन मोबाइल नंबर प्रविष्ट केल्यानंवर, send OTP पर्यायावर क्लिक करावे लागेल. 
  • सर्वात शेवटी पेमेंटचा पर्याय येईल त्यावर क्लिक करून तुम्ही विविध डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून 50 रुपये भरावे लागतील. आता तुमचे Aadhaar PVC Card ऑर्डर झाले असून स्पीड पोस्टद्वारे चमकणारे क्रेडिट कार्डसारखे दिसणारे स्मार्ट आधार कार्ड जास्तीत जास्त १५ दिवसांत तुमच्या घरी पोहोचेल.

PVC Aadhaar card चे वैशिष्ट्ये

PVC Aadhaar card

UIDAI नुसार, नवीन PVC कार्डची छपाई आणि लॅमिनेशनची गुणवत्ता अधिक चांगली असून ते आकर्षक दिसण्यासोबतच दीर्घकाळ टिकते. सर्वात महत्त्वाचे वैशिष्ठ्ये म्हणजे हे स्मार्ट आधार कार्ड पावसाच्या पाण्यात सुद्धा खराब होत नाही अर्थातच ते water proof आहे.

Similar Posts