Sauchalay Yojana 2022 | शौचालयासाठी घरबसल्या अर्ज करून मिळवा, 12 हजार रुपये अनुदान
Sauchalay Yojana 2022: केंद्र सरकार अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत अभियानामुळे अनेकांना शौचालय मिळालेली आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयासाठी अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन अनेकांनी शौचालयाचे बांधकाम केले आहे. स्वच्छ भारत अभियान हे महत्वकांक्षी योजना ठरली आहे.
स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील, खेड्यातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय नसेल तर त्यांना वैयक्तिक शौचालयासाठी आता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ही सुविधा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सुरू केली आहे.
ग्रामीण भागात अनेक कुटुंबांची परिस्थिती बेताची असल्याने शौचालय बांधणे होत नाही. गेल्या काही वर्षांत हागणदारीचं प्रमाण कमी झालं असलं तरी राज्यातील प्रत्येक गाव पूर्णपणे हागणदारीमुक्त व्हावे अशी राज्य सरकारची योजना आहे.
स्वच्छ भारत अभियान 2022 | Sauchalay Yojana 2022
या स्वच्छ भारत अभियान (Swachh Bharat Abhiyan) मार्फत ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन अनुदानासाठी अर्ज करता येईल, अशी माहिती या अगोदरच्या ठाकरे सरकार मधील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
राज्यात ग्रामीण भागात स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, स्वच्छतेची व्याप्ती वाढविणे आणि उघड्यावर शौचाला व मलविसर्जन करण्यास प्रतिबंध करण्यासाठी सरकार अनेक वर्षांपासून नवीन उपक्रम राबवित आहे. (Shauchalaya Yojana Maharashtra)
लाभार्थी कुटुंबांनी वैयक्तिक शौचालय बांधण्याचे काम पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रोत्साहन अनुदान दिल्या जाते. या योजनेतंर्गत, अनुसूचित जमाती, लहान आणि अल्पभूधारक शेतकरी, दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंबे आणि दारिद्र्य रेषेवरील अनुसूचित जाती, भूमिहीन शेतमजूर, शारिरीकदृष्ट्या अपंग आणि महिला कुटुंब प्रमुख हे घटक अनुदानासाठी पात्र आहेत.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात शौचालय बांधकामासाठी अनेकांनी अनुदानाचा लाभ घेतला. आता दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागातील, खेड्यातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय उपलब्ध व्हावीत यासाठी तुम्ही वैयक्तिक शौचालयासाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करू शकतात.
येथे करा अर्ज
स्वच्छ भारत अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात 66 लाख 42 हजार 890 कुटुंबांना वैयक्तिक शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. (Toilet Scheme in Maharashtra)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील वेबसाईटवर जा. https://sbm.gov.in/sbm_dbt/secure/login.aspx
किंवा तुम्ही या दुसऱ्या वेबसाईटवरून देखील ऑनलाईन अर्ज करू शकतात. https://sbm.gov.in/sbmphase2/secure/login.aspx
ग्रामीण भागातील, खेड्यातील कुटुंबांना वैयक्तिक शौचालय नसेल त्यांना शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत अभियान मार्फत अनुदान दिले जात आहे. ही माहिती नागरिकांसाठी महत्वाची आहे. आपणं थोडंसं सहकार्य करून ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा.