SBI E-Mudra Loan Apply Online: आता 5 मिनिटांत मिळवा 50 हजार रुपयांचे कर्ज! असा करा अर्ज!

SBI E-Mudra Loan Apply Online: आजच्या व्यवसाय आणि उद्योजकतेच्या काळात, रोजच्या आर्थिक समस्या संपवण्यासाठी एक चांगला आणि योग्य पर्याय शोधणे महत्त्वाचे झाले आहे. जर तुम्हाला उद्योग व्यवसाय करायचा असेल तर आनंदी जीवनाकडे आणि यशाकडे वाटचाल करताना, तुमचे व्यवसाय करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी SBI E Mudra Loan हा एक उत्तम पर्याय आहे. या पोस्टमध्ये आम्ही SBI E Mudra Loan साठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा?, त्याचे फायदे आणि पात्रता काय आहे, याबद्दल अधिक माहिती देणार आहोत.

SBI E-Mudra Loan
SBI E-Mudra Loan Apply Online

तुम्ही SBI E Mudra Loan अंतर्गत कर्ज मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता, परंतु ऑनलाइन अर्ज केला तर तुम्हाला फक्त ₹50000 पर्यंत कर्ज दिले जाईल, आणि यापेक्षा जास्त कर्ज घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन प्रक्रियेतून जावे लागेल. SBI E Mudra Loan Apply Online

SBI E-Mudra Loan म्हणजे काय? | What is SBI E-Mudra Loan?

2018 मध्ये भारत सरकारने पंतप्रधान मुद्रा कर्ज ही योजना सुरू केली होती, याअंतर्गत जे कोणी लहान व्यावसायिक किंवा मोठे व्यापारी असतील, जे पैशाच्या कमतरतेमुळे आपला व्यवसाय वाढवू शकत नाही किंवा व्यवसाय करण्यास असमर्थ आहे, त्यांना बँकांकडून कर्ज दिले जाते. या योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना SBI E-Mudra Loan देते. SBI E-Mudra Loan हा व्यवसाय आणि उद्योजकतेसाठी आवश्यक आर्थिक सहाय्य प्रदान करणारा एक सोपा मार्ग आहे, आणि तो SBI (state bank of india) द्वारे नियंत्रित केला जातो.

SBI E-Mudra Loan Apply Online

SBI e-Mudra loan कर्जाद्वारे, स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना ₹ 50 हजार ते ₹ 1 लाखांपर्यंतचे कर्ज देते. SBI ई मुद्रा लोन अंतर्गत तुम्हाला 5 मिनिटांच्या आत 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही त्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला कागदपत्र जमा करण्यासाठी कोणताही त्रास होणार नाही आणि फक्त पाचच मिनिटांत तुमच्या खात्यात 50,000 रुपयांचे कर्ज येईल.

परंतु जर तुम्हाला ₹ 50 हजार ते ₹ 1 लाखांपर्यंतचे चे कर्ज घ्यायचे असेल तर अर्जदाराला त्याचे SBI बचत/चालू खाते असलेल्या शाखेला भेट देऊन कागदपत्रांवर सही करून सर्व आवश्यक गोष्टी पूर्ण कराव्या लागतील. आवश्यक गोष्टी पूर्ण केल्यावर, तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर पुढील प्रक्रियेबद्दल माहिती देणारा एक SMS प्राप्त होईल. कर्ज मंजुरीचा एसएमएस मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत तुम्हाला पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

एसबीआय ई-मुद्रा कर्जाचे फायदे | Benefits of SBI E-Mudra Loan

 • सुलभ आणि जलद ऑनलाइन अर्ज प्रक्रिया.
 • किमान कागदपत्रे आवश्यक.
 • कमाल कर्जाची रक्कम 01 लाखांपर्यंत आहे.
 • कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून मिळते.

एसबीआय ई मुद्रा कर्जासाठी पात्रता निकष: SBI E-Murda Loan Eligibility

 • अर्जदार हा लघु (सूक्ष्म) उद्योजक असावा.
 • अर्जदाराचे SBI च्या कोणत्याही शाखेत चालू/बचत खाते असावे.
 • अर्जदार किमान 6 महिन्यांसाठी SBI मध्ये चालू/बचत खातेधारक असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराचे केवायसी पूर्ण असले पाहिजे
 • अर्जदाराचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडलेला असावा

SBI E-Mudra Loanसाठी आवश्यक कागदपत्रे | Important documents

 • अर्जदाराचे आधार कार्ड
 • अर्जदाराचे पॅनकार्ड
 • बचत/चालू खाते क्रमांक आणि अर्जदाराचे खाते ज्या शाखेत सुरू आहे त्याची माहिती.
 • अर्जदाराच्या व्यवसायाचा पुरावा.
 • UIDAI – आधार क्रमांक (खात्यात अपडेट करणे आवश्यक आहे).
 • जातीचे तपशील (जनरल/SC/ST/OBC/अल्पसंख्याक)
 • अपलोड करण्यासाठी इतर तपशील जसे: GSTN आणि उद्योग आधार (उपलब्ध असल्यास)
 • दुकान आणि व्यवसाय स्थापनेचा पुरावा किंवा इतर व्यवसाय नोंदणी पुरावा (उपलब्ध असल्यास)
 • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी

एसबीआय ई मुद्रा कर्ज ऑनलाइन अर्ज करा | SBI E-Mudra Online Application

SBI e Mudara कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

 • SBI वेबसाइटला भेट द्या: तुम्हाला सर्वप्रथम SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) च्या अधिकृत वेबसाइट https://www.sbi.co.in/ वर जावे लागेल.
 • SBI E Mudra Loan पेजवर जा: या वेबसाइटवर गेल्यावर, “SBI E Mudra Loan” अर्ज किंवा सेवा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.
 • अर्ज भरा: तुम्हाला ऑनलाइन अर्ज दिला जाईल. यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक आणि व्यावसायिक माहिती भरावी लागेल जसे की नाव, पत्ता, पॅन कार्ड क्रमांक, व्यवसाय तपशील, कर्जाची रक्कम आणि उद्देश इ. आवश्यक माहिती भरल्यानंतर, तुम्हाला अर्ज सबमिट करण्यासाठी एक OTP (वन-टाइम पासवर्ड) प्राप्त होईल. हा OTP दिलेल्या जागेत नोंदवा.
 • सर्व कागदपत्र सबमिट करा: तुम्हाला SBI ने अर्ज प्रक्रियेदरम्यान सांगितलेले सर्व कागदपत्र सबमिट करणे आवश्यक आहे. यामध्ये वैयक्तिक ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड), व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे, बँकेशी संबंधित कागदपत्रे (खाते स्टेटमेंट, बँक स्टेटमेंट) यांचा समावेश असू शकतो.
 • अर्ज प्रक्रिया पूर्ण करा: कागदपत्रे सबमिट केल्यानंतर, तुमचा अर्ज प्रक्रियेसाठी पूर्ण होईल. SBI अधिकारी तुमच्या अर्जाची पडताळणी करतील आणि जर सर्व माहिती, कागदपत्र बरोबर असल्यास, तुम्हाला बँकेकडून आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल.
 • या प्रक्रियेदरम्यान, तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास, तुम्ही जवळच्या एसबीआय शाखेशी संपर्क साधू शकता किंवा ऑनलाइन चॅट किंवा टोल-फ्री नंबरद्वारे त्यांच्याशी संपर्क साधू शकता. SBI E-Mudra Online Application
 • एसबीआय ई मुद्रा कर्ज व्याज दर | SBI E-Murda Loan Interest Rate
 • SBI e Mudra कर्जाअंतर्गत ₹ 50 हजारांपर्यंतची रक्कम मिळाल्यानंतर, म्हणजेच कर्ज मिळाल्यानंतर तीन महिन्यांपासून हे कर्ज 5 वर्षांत 57 सुलभ हप्त्यांमध्ये 9.5% व्याजदराने SBI बँकेला परत करावे लागेल.
 • 9.5% व्याजदरानुसार 64296 रुपये म्हणजेच 1128 रुपये दरमहा तुमच्या खात्यातून 5 वर्षात 57 हप्त्यांमध्ये कापले जातील. SBI E-Murda Loan

Similar Posts