PhonePe Personal Loan: आता PhonePe देणार 50,000 रुपयांचे वैयक्तिक कर्ज, 5 मिनिटांत खात्यात पैसे जमा!

PhonePe Personal Loan: PhonePe एक असं मोबाईल ऍप्लिकेशन आहे, ज्याचा वापर आज प्रत्येकजण डिजिटल व्यवहारांसाठी करत आहे. तुम्ही देखील Phonepe वापरत असालच, परंतु तुम्हाला माहित आहे का की PhonePe देखील थर्ड पार्टीच्या मदतीने कर्ज प्रदान देते. जर तुम्हाला वैयक्तिक कर्जाची गरज असेल, तर तुम्ही PhonePe वरून वैयक्तिक कर्ज घेऊन तुमची गरज पूर्ण करू शकता, कारण PhonePe वरून वैयक्तिक कर्ज घेणे खूप सोपे आहे. 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज तुम्ही Phonepe च्या साहाय्याने अगदी 10 च मिनिटांत घरी बसून मिळवू शकता.

परंतु फोनपे वैयक्तिक (PhonePe Personal Loan) कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला त्या कर्जाशी संबंधित माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल, तर काही हरकत नाही, पुढे या लेखात आम्ही तुम्हाला PhonePe द्वारे वैयक्तिक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा आणि तुम्हाला PhonePe कडून वैयक्तिक कर्ज कसे मिळेल? याबाबत संपूर्ण माहिती देणार आहोत. सोबतच या लेखात आम्ही तुम्हाला फोनपे मधील वैयक्तिक कर्ज पात्रता, व्याजदर आणि कागदपत्रे इत्यादीबद्दल देखील सांगणार आहोत, तर या सविस्तर माहितीसाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत अवश्य वाचा.

PhonePe वर वैयक्तिक कर्ज कसे मिळवायचे? | get personal loan

जर तुम्हाला PhonePe वरून कर्ज घ्यायचे असेल तर आधी हे जाणून घ्या की तुम्ही थेट PhonePe वरून कर्ज घेऊ शकत नाही. PhonePe हे ॲप थर्ड पार्टीच्या अर्जाच्या मदतीने कर्ज मंजूर करते. PhonePe काही पार्टनर कंपन्यांद्वारे कर्ज देते, म्हणून PhonePe वरून वैयक्तिक कर्जासाठी, तुम्हाला त्यांच्या पार्टनर कंपन्यांचे ॲप सुद्धा डाउनलोड करावे लागेल आणि कर्जासाठी अर्ज करावा लागेल. या ॲप्सद्वारे तुम्ही आधार कार्डचा वापर करून कर्जासाठी अर्ज करू शकता.

Flipkart, Kredit Bee, MoneyView, Bajaj finserv, Navi, Payme India हे काही ॲप्लिकेशन आहेत जे PhonePe वरून वैयक्तिक कर्ज प्रदान करतात. PhonePe वरून कर्ज घेण्यासाठी, तुम्हाला प्रथम PhonePe Business App मध्ये नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर Google Play Store वरून कोणत्याही पार्टनर कंपनीचे ॲप डाउनलोड करावे लागेल आणि त्यांनतर कर्जासाठी अर्ज करावा लागेल. तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरून जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल. PhonePe Personal Loan

आजच्या काळात, जेव्हाही आपल्याला पैशांची गरज भासते, तेव्हा आपण मित्र किंवा नातेवाईकाकडून कर्ज घेतो किंवा बँकेकडून कर्ज घेतो, पण या कामासाठी खूप वेळ लागतो, कधीकधी या प्रोसेस ला 3 ते 10 दिवस सुद्धा लागतात. या व्यतिरिक्त, जर तुम्ही PhonePe ऍप्लिकेशन वरून कर्ज घेतले तर तुम्हाला त्याचा भरपूर फायदा मिळू शकतो आणि यामुळे तुमचा खूप वेळ देखील वाचू शकतो, या ॲप्लिकेशन वरून खूप कमी वेळात आणि अतिशय कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होते.

PhonePe Personal Loan 2024

आजच्या काळात अनेक सरकारी, निमसरकारी आणि खाजगी कंपन्या कर्ज द्यायला तयार आहेत, यासाठी तुम्हाला फक्त योग्य पद्धतीने अर्ज करण्याची गरज आहे. PhonePe ही अशीच एक कंपनी आहे जी लोकांना कमी वेळात कर्ज उपलब्ध करून देते. PhonePe वरून कर्ज घेण्यासाठी अर्जदाराला काही पात्रता पूर्ण करण्याची आवश्यकता असते, ज्याबद्दल आम्ही पुढे सांगितलं आहे.

PhonePe कडून कर्ज घेण्यासाठी आवश्यक पात्रता | Eligibility Criteria

PhonePe कडून कर्ज घेण्यासाठी, अर्जदाराने खाली दिलेले काही महत्त्वाचे पात्रता निकष पूर्ण असणे आवश्यक आहे –

  • PhonePe Personal Loan घेण्यासाठी अर्जदार हा मूळ भारतीय असणे गरजेचे आहे, सोबतच अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • याशिवाय, अर्जदाराच्या फोनमध्ये PhonePe ऍप्लिकेशन इंस्टॉल केलेले असणे आवश्यक आहे आणि त्यात PhonePe खाते चालू असणे देखील आवश्यक आहे.
  • या कर्जासाठी पात्र होण्यासाठी अर्जदाराचे मासिक वेतन हे 25 हजार रुपयांपेक्षा जास्त असावे.
  • याशिवाय, अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर चांगला असावा आणि कोणत्याही प्रकारचे कर्ज थकलेले किंवा डिफॉल्ट नसावे.
  • वरील सर्व पात्रता निकष कर्ज घेण्यासाठी आवश्यक आहेत.

PhonePe वर कोणत्या प्रकारचे कर्ज उपलब्ध आहे? | Types of loan

PhonePe Personal Loan घेण्यासाठी असा कुठलाही थेट पर्याय उपलब्ध नाही जिथून तुम्ही कर्ज घेऊ शकता. पण, तुम्ही कोणत्याही थर्ड पार्टी द्वारे अर्ज करू शकता आणि या अर्जाद्वारे कर्ज घेऊ शकता. याशिवाय तुम्ही या ॲप्लिकेशनद्वारे गोल्ड लोन देखील घेऊ शकता. जर तुम्ही थर्ड पार्टी कडून वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

स्टेप 1 – यासाठी सर्वप्रथम तुम्हाला PhonePe ऍप्लिकेशन ओपन करावे लागेल.
स्टेप 2 – यानंतर, तुम्हाला अनेक लोन बॅनर आणि जाहिराती दिसतील ज्याद्वारे तुम्ही फोनपेद्वारे थर्ड पार्टीकडून कर्ज घेऊ शकता

या ॲप्लिकेशनद्वारे अनेक कंपन्या जसे की, नवी लोन ॲप, क्रेडिट बी लोन ॲप इत्यादी, लोकांना कर्जाच्या ऑफर देतात, त्यांच्या मदतीने तुम्ही सहज कर्ज घेऊ शकता. या सर्वांमध्ये, कर्ज घेण्यासाठी अर्ज पात्रता वेग वेगळ्या पद्धतीने निर्धारित करण्यात येतात.

PhonePe वर उपलब्ध असलेल्या अर्जावर किती व्याज आहे? | Interest rate

तुम्ही कोणत्याही थर्ड पार्टी ॲपचा वापर करून PhonePe वरून कर्ज घेतल्यास, तुम्हाला त्या थर्ड पार्टी ॲपवरूनच भरावा लागणारा व्याजदर कळेल. तुम्ही ज्या ॲप वरून कर्ज घ्याल त्यावर व्याजदराची सगळी माहिती दिली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!