SBI Personal Loan: घरबसल्या एका क्लिकवर मिळवा 35 लाख; जाणून घ्या कोणाला मिळू शकते कर्ज

SBI Personal Loan
SBI Personal Loan

आपण घर बसल्या कोणत्या पद्धतीने 35 लाखां पर्यंत कर्ज मिळू शकतो. म्हणजेच 35 लाख रुपये कर्ज काढण्यासाठी आपल्याला अर्ज कोठे करावा लागणार आहे. पात्रता काय आहे, अटी आणि शर्ती कोणकोणत्या आहेत अशी संपूर्ण माहिती आपण AbdNews.in च्या या लेखात घेऊ.

स्टेट बँक ऑफ इंडियाने योनो अॅपच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज योजना आणली आहे. रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट सादर केले जाते. पात्र ग्राहकांना आता योनो अॅपवर कोणत्याही कागदपत्रांशिवाय 35 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज घेता येणार आहे.

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ग्राहकांसाठी अवघ्या एका क्लिकवर वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देणार आहे. ग्राहकांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय 35 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेता येणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.

बॅंकेच्या योनो अॅपवर रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट योजना सादर केली आहे. ग्राहकांना कर्जासाठी बॅंकेत जाण्याची गरज नाही.पात्र ग्राहकांना आता योनो अॅपवर (YONO App) ग्राहकांना वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी एसबीआय बँकेच्या कोणत्याही शाखेत जावे लागू नये, यासाठी त्यांना सुविधा आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम बनविणे या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

एसबीआय रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिटवरील (RTXC) पर्सनल लोन फीचर पगारदार ग्राहकांना उपलब्ध आहे. ज्यांचे बॅंकेत वेतन खाते आहे, ते या कर्जासाठी पात्र आहे. कर्ज सुलभतेसाठी पात्रता, क्रेडिट चेक, कागदपत्रे आणि इतर प्रक्रिया डिजिटल पद्धतीने केल्या जातील.

SBI Personal Loan चा यांना होईल फायदा

बँकेने म्हटल्यानुसार, रियल टाइम एक्सप्रेस क्रेडिट अंतर्गत, केंद्र किंवा राज्य सरकार आणि बँकेत वेतन खाते असलेल्या ग्राहकांना यापुढे शाखेत जाऊन वैयक्तिक कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही. एसबीआयने म्हटले आहे की क्रेडिट चेक, पात्रता, मंजुरी आणि दस्तऐवजीकरण आता रिअल टाइममध्ये डिजिटलपद्धतीने करण्यात येणार आहे. 

बँकेचे अध्यक्ष दिनेशकुमार खरा यांनी सांगितले की, एक्सप्रेस क्रेडिट प्रॉडक्टच्या मदतीने बँकेच्या ग्राहकांना डिजिटल, विनाव्यत्यय आणि पेपरलेस कर्जप्रक्रियेचा अनुभव घेता येईल.

एसबीआयमध्ये वेतन खाते असणाऱ्यांना एसबीआयची रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये एका अटींची पूर्तता करावी लागणार आहे, या कर्ज योजनेसाठी कर्जदाराचे मासिक उत्पन्न किमान 15 हजार रुपये असणे आवश्यक आहे. केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारी, केंद्रीय सार्वजनिक उपक्रम आणि नफा कमावणारे राज्य सरकारचे सार्वजनिक उपक्रम, राष्ट्रीय प्रतिष्ठा असलेल्या शैक्षणिक संस्था, निवडलेले नगरसेवक ,त्यांचे बँकेशी संबंध असोत वा नसोत. या सगळ्यांसोबत काम करणं महत्त्वाचं असल्याचं बॅंकेने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!