Solar Rooftop Yojana | अरे वा… एकदाच खर्च करून 25 वर्ष मोफत वीज मिळवा, सरकारही देते अनुदान; असं करा अर्ज..
Solar Rooftop Yojana | 25 वर्षापर्यंत विज बिल येईल 0 रुपये! फक्त एकदा योजनेतून बसवा घराच्या छतावर सोलर पॅनल; पहा सबसिडी व अर्ज प्रक्रिया..
Solar Rooftop Yojana | आपल्या घरचे विजेचे बिल हे कमी यावे असे सर्वांनाच वाटते. त्यासाठी आपले केंद्र सरकार एक विशेष योजना राबवित आहेत. सौरऊर्जेला चालना देण्यासाठी सरकारने आता रूफ टॉप सोलर योजना चालू केली आहे. ज्याच्या अंतर्गत तुम्हाला सबसिडी देऊन तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. एकदा तुम्ही तुमच्या घराच्या छतावरती जर का सौर पॅनल लावले तर तुमच्या विजेच्या बिलापासून तुम्हाला दीर्घकाळ सुटका होईल.
वाढत्या महागाईमुळे जनतेचे बजेट हे बिघडलेले आहे आणि दैनंदिन वस्तूंच्या किमती देखील गगनाला पोहोचल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची बचत होणे कठीण झाले आहे. पण एखादी पद्धत अवलंबून तुम्ही तुमचा खर्च कमी करू शकता किंवा त्याच्यावरती नियंत्रण आणू शकता. मात्र यासाठी तुम्हाला देखील थोडाफार खर्च करावा लागतो परंतु आता याच कामांमध्ये तुम्हाला सरकारद्वारे मदत देखील मिळणार आहे (Solar Rooftop Yojana application maharashtra). तुम्हाला फक्त तुमच्या घराच्या छतावरती सोलर पॅनल बसवायचे आहे व याच्यामुळे तुमची महागड्या वीजबिलापासून सुटका तर १०० टक्के होईल.
तुमच्या घराच्या छतावरती सोलर पॅनल बसवून तुम्हाला आवश्यक इतकी वीज तुम्ही सहजरित्या तयार करू शकता. या कामासाठी सरकार देखील तुमच्या सोबत आहे. सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाकडून या कामासाठी अनुदान प्राप्त करून दिले जाते. यामुळे जर तुम्हाला तुमच्या घराच्या छतावरती सोलर प्लेट्स बसवायचे असतील तर तुम्हाला शासनाकडून सबसिडी देण्यात येईल (Solar Rooftop Yojana subsidy in maharashtra). पण सर्वात आधी तुम्हाला किती विजेची गरज आहे याचे मूल्यांकन करावे लागेल व त्यावरून तुम्हाला कळेल की तुम्हाला किती क्षमतेचे सोलर पॅनल तुमच्या घरावरती बसवायचे आहे.
Solar Rooftop Yojanaचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे-
तुमच्या घरात 2 किंवा 3 पंखे, 1 फ्रिज, 6 ते 8 एलईडी लाईट, पाण्याची मोटर आणि टीव्ही यासारख्या विजेवरच्या वस्तू असतील तर तुम्हाला जर रोज 6 ते 8 युनिट वीज लागेल. याच्यासाठी तुम्हाला 2 kW चा सोलर पॅनल बसवावा लागेल (Solar Rooftop Yojana apply online). मोनो पार्क बायफेशियल सोलर पॅनल हे सध्याचे नवीन व सुप्रसिद्ध तंत्रज्ञान असलेले सौर पॅनल आहे. याच्यामुळे पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूस वीज निर्माण होते व 2 किलोवॅटसाठी 4 सौर पॅनल लागतील.
Solar Rooftop Yojana किती टक्क्यांपर्यंत मिळेल अनुदान
भारतामध्ये सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने रूफटॉप योजना सुरू केलेली आहे. डिस्कोम पॅनल मध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही विक्रेत्याकडून तुम्ही तुमच्या घराच्या छतावरती सौर पॅनल बसवू शकता आणि त्यानंतर तुम्ही सबसिडीसाठी अर्ज देखील करू शकता (Solar rooftop yojana in india). जर तुम्ही रूफटॉप सोलर पॅनल 3 kW पर्यंत लावले तर तुम्हाला सरकारकडून जवळपास 40 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाईल. 10 kW क्षमतेसाठी सरकारकडून 20 टक्के सबसिडी दिली जाईल.
सोलर पॅनल बसवण्यासाठी किती खर्च येईल-
जर तुम्ही तुमच्या घरावरती 2 किलोवॅटचा सौर पॅनल लावणार असाल तर त्यासाठी तुम्हाला सुमारे 1,20,000 रुपये द्यावे लागतील. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सरकारकडून 40% सबसिडी दिली जाईल म्हणजेच तुम्हाला तुमचा स्वतःचा खर्च हा 72 हजार रुपये होईल. या योजनेमध्ये तुम्हाला सरकारकडून 48 हजार रुपये सबसिडीच्या द्वारे दिले जातील. सौर पॅनलचे आयुष्य हे 25 वर्षे असते त्यामुळे तुम्ही एकदा भांडवल गुतवून दीर्घकाळ विजेच्या बिलापासून सुटका करू शकता Apply for Solar Rooftop yojana . दरम्यान सोलार पॅनलच्या देखभालीचा खर्चही कमी असतो परंतु त्याच्या बॅटरी 10 वर्षानंतर बदलाव्या लागतात.
या योजनेसाठी अर्ज कसा करायचा-
जर तुम्हाला सुद्धा तुमच्या घरावरती सौर पॅनल लावायचे असेल तर तुम्ही राज्य सरकारच्या अक्षय ऊर्जा विकास प्रधीकरणाशी संपर्क साधून अर्ज करू शकता. त्यासाठी प्रत्येक राज्यातील प्रमुख शहरांमध्ये यांची कार्यालय देखील सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय खाजगी डीलर्स सुद्धा सोलर पॅनल विकतात त्यासाठी तुम्हाला तुमच्या कर्जाच्या रकमेसाठी आगाव प्रधीकरणाशी संपर्क करावा लागेल Solar Roof Application. अनुदानाचा फॉर्म हा तुमच्या संबंधित प्रधिकरणाकडून तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हाला सौर ऊर्जा टॉप स्कीमची अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या हेल्पलाइन नंबर १८००-१८०-३३३३ वरती कॉल करून त्यांच्याशी संपर्क साधू शकता व तुमच्या शंकांचे निरासन करू शकता.
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्ही सोलार योजनेच्या अधिकृत वेबसाइट- https://solarrooftop.gov.in/– ला भेट द्या
- वेबसाईट उघडल्यावर होम पेजवर Apply for Solar Rooftop या पर्यायावर क्लिक करा
- नंतर आता तुमच्या स्टेट या लिंकवर क्लिक करावे
- आता तुमच्या स्क्रीनवर Solar Roof Application चे पेज ओपन होईल .
- त्याअर्जात सर्व माहिती भरून सबमिट या पर्यायावर क्लिक करा
- वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुमची ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल