Sukanya Samriddhi Yojana in Marathi | सुकन्या समृद्धी योजनेत मुलींना मिळतात 71 लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर

Sukanya Samriddhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana in Marathi: मुलींसाठी महत्वकांक्षी योजना.. ‘सुकन्या समृद्धी योजना’.. केंद्र सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत आहे. तरुणांसाठी नवीन रोजगाराच्या संधी, वृध्द लोकांना पेन्शन, शेतकऱ्यांसाठी, लहान मुलांसाठी देखील विविध योजना सरकार राबवित आहे. तसेच आता मुलींसाठी सरकार ही योजना सुरू केली आहे.

सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना या गुंतवणुकीचे चांगले पर्याय आहेत. त्यांच्या चांगल्या परतव्यामुळे या योजना सामान्य नागरिकांमध्ये खूप लोकप्रिय झालेल्या आहेत. अशाच काही योजना देशातील महिला व मुलींसाठी आहे. यातील एक महत्वाची योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना होय. (Sukanya Samriddhi Yojana Maharashtra)

घरातील मुलींसाठी विशेष असलेली योजना सुकन्या समृद्धी योजना आहे. आता मुलीच्या जन्माचे स्वागत आणि कौतुक या योजनेअंतर्गत सरकार करते. ही योजना 2015 साली सुरू करण्यात आली. मुलींच्या शिक्षणासाठी व विवाहासाठी पैसे उभारण्यासाठी प्रोत्साहित करणे हाच या योजनेचा उद्देश आहे. या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

सुकन्या समृद्धी योजनेबाबत…


सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडताना मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असायला हवे. मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर या योजनेचा फायदा मुलीला मिळतो. मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी या योजनेचा फायदा होईल. या योजनेत नियमितपणे पैसे भरल्यास तुम्हाला 71 लाख रुपये मिळू शकतात. (Sukanya Samriddhi Yojana Age Limit)

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर पहिल्या 10 वर्षातच खाते उघडणे आवश्यक आहे. एकच पालक किंवा कायदेशीर पालक मुलींच्या नावे दोन खाते उघडू शकतात. या योजनेत 250 रुपयांत खाते उघडावे लागेल. यानंतर वर्षाकाठी दीड लाखांपर्यंत या खात्यात रक्कम जमा करता येईल. (Sukanya Samriddhi Yojana Calculator)

खाते उघडल्यानंतर पुढील 15 वर्षे न चुकता खात्यात पैसे भरणे आवश्यक आहे. खाते उघडल्याच्या 21 वर्षांनंतर योजनेची मुदत संपेल आणि हे पैसे खातेदाराला मिळून जातील. समजा, तुम्ही 15 वर्षे दर महिन्याला न चुकता 12,500 रुपये भरले, तर मॅच्युरिटीवेळी 71 लाख रुपये मिळतात.

Sukanya Samriddhi Yojana योजनेची पात्रता


सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मुलगी घेऊ शकते.
या योजनेअंतर्गत खाते उघडताना मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.
सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडताना, मुलीच्या वयाचा पुरावा असणं गरजेचं आहे.
या योजनेच्या सर्व अटी व शर्ती पूर्ण लाभ घेता येईल. (SSY Scheme)

Sukanya Samriddhi Yojana अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे


सुकन्या समृद्धी योजना फॉर्म
मुलीचे जन्म प्रमाणपत्र
ठेवीदाराचा ओळख पुरावा जसे – आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, दहावी प्रमाणपत्र, पॅन कार्ड (पालक किंवा कायदेशीर पालक)
ठेवीदाराच्या पत्त्याचा पुरावा जसे – वीजबिल, टेलिफोन बील, रेशनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स (पालक किंवा कायदेशीर पालक)

असा करा अर्ज..


सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खाते उघडावे लागेल. (Sukanya Samriddhi Yojana Post Office) हे खाते तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊ खाते उघडू शकता. सुकन्या समृद्धी योजनेचा फॉर्म भरून व आवश्यक कागदपत्रे जोडून पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज सादर करा.

हे देखील वाचा-

घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
योजना सौर पॅनेल बसवा आणि २५ वर्ष मोफत वीज मिळवा.
1 KW सोलर लावायला काय खर्च येईल? त्यावर काय काय चालू शकते??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!