Talathi Exam: तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी ! परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत परीक्षा..

Talathi Recruitment Exam: भूमी अभिलेख विभागाच्या तर्फे तलाठी (गट-क) या पदासाठीचे परीक्षेचे वेळापत्रक व तारखा जाहीर करण्यात आल्या असून तलाठीसाठीची ही परीक्षा दिनांक १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सष्टेंबर २०२३ या कालावधीमध्ये होणार आहेत. परीक्षा घेण्याची संपूर्ण तयारी झाली असून भरतीसाठी पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव कमीत कमी दहा दिवस पूर्वी कळविण्यात येणार आहे.

पूर्ण राज्यभरातून तलाठी पदाच्या ४ हजार ४६६ या पदासाठी तब्बल ११ लाख १० हजार ५३ उमेदवार बसणार आहेत. या सर्व उमेदवारांना व्यवस्थित परीक्षा देता यावी, याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्र असणार आहे. सदरील परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. त्यात सकाळी ९:०० ते ११:००, दु. १२.३० ते २.३० आणि सायं. ४.३० ते ६.३० अशा वेळा निश्चित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांना अगोदरच ऑनलाइन परीक्षेचे गाव समजणार असून परीक्षा केंद्र मात्र तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच समजणार आहेत. Talathi Recruitment Exam Date..

परीक्षा केंद्रावर कसलाही अनुसुचित प्रकार घडू नये, याकरिता ही दक्षता घेण्यात आली आहे. ही परीक्षा TCS कंपनीतर्फे घेण्यात येणार आहेअसल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाचे अपर जमाबंदी आयुक्त आणि राज्य परीक्षा समन्वयक आनंद रायते यांनी दिली.

तलाठी पदाकरिता संगणकावर आधारित एकूण २०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. गुणवत्ता यादीमध्ये समावेश होण्याकरिता एकूण गुणांच्या किमान ४५ % गुण मिळवणे गरजेचे आहे, असेसुद्धा रायते यांनी स्पष्ट केले.

  • परीक्षा टप्पे खालीलप्रमाणे?
    • पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट
    • दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट – १ सप्टेंबर
    • तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर – १४ सप्टेंबर

  • लक्षात ठेवा २३, २४, २५ ऑगस्ट बरोबरच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा घेण्यात येणार नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!