Maharashtra Talathi Bharti Application Date: तलाठी भरती करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली विधानसभेत मोठी घोषणा

Maharashtra Talathi Bharti Application Date: तलाठी भरतीच्या परीक्षेला महाराष्ट्रातील तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यासाठी अनेक तरुण आजही अर्ज करतच आहेत. दरम्यान तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे. तलाठी भरती अर्ज प्रक्रियेसाठी मुदतवाढ दिल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरीषदेत केली. तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची १७ जुलै ही अंतिम तारीख होती. त्यानंतर प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज करण्याबरोबरच परीक्षा शुल्क भरण्यासाठी एक दिवसाची मुदत वाढवून देण्यात आलेली होती. आता त्यात आणखी वाढ करण्यात आली आहे.

तलाठ रिक्त पदासाठी ऑगस्ट/सप्टेंबर महिन्यातमध्ये परीक्षा होण्याची शक्यता असून यासाठी अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे, पण ही मुदतवाढ नेमकी किती तारखेपर्यंत असेल हे स्पष्ट करण्यात आले नाही. यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले आहे. तलाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रियेची पुन्हा एकदा मुदत वाढविण्याची विनंती महसुल मंत्र्यांनी केल्यामुळे याला मुदतवाढ देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील ६ विभागातंर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांमधील ४ हजार ६४४ रिक्त पदांच्या भरती केली जाणार आहे. यात पुणे, नाशिक, नागपूर, छ. संभाजीनगर (औरंगाबाद), कोकण, तसेच अमरावती या विभागांचा समावेश आहे.

एकच प्रश्नपत्रिका

सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे या तलाठी भरती परीक्षेकरिता राज्यातील सर्व जिल्हातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकरिता एकच प्रश्नपत्रिका राहणार आहे.

TCS घेणार परीक्षा

मागील परीक्षेदरम्यान झालेल्या गैरव्यवहाराची उदाहरणे पाहून राज्य शासनाने महत्वाची पावले उचलली आहेत. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा TCS कंपनीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. ही परीक्षा घेण्यासाठी TCS कंपनीकडून १७ ऑगस्ट २०२३ किंवा १२ सप्टेंबर २०२३ या दोन तारखांचे पर्याय दिले आहेत.

एकाच जिल्ह्यातून अर्ज

तलाठी भरतीच्या परीक्षेकरिता अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना फक्त एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार असल्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज भरल्यास ते बाद होतील याची नोंद घ्यावी.

अर्ज शुल्क

तलाठी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण गटातील उमेदवारांना १०००/- तर आरक्षित गटातील उमेदवारांना ९००/- रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!