टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक कारला आग, व्हिडिओ व्हायरल, टाटा मोटर्सने दिले तपासाचे आश्वासन..
Tata Nexon EV ने घेतला पेट घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना मुंबईतील वसई भागातील असून तेथे नेक्सनला अचानक आग लागली. व्हिडिओमध्ये अग्निशमन दलाचे जवान गाडीतील आग विझवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कार निर्मात्याने या घटनेबाबत एक निवेदन जारी करून या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे.
मुंबईतील वसई परिसरात कारला आग लागली
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, मुंबईतील वसई भागातील एका रेस्टॉरंटच्या बाहेर कारला आग लागली. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. कारला आग कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
टाटा मोटर्स म्हणाले – तपास सुरू आहे
टाटा मोटर्सने एका निवेदनामध्ये म्हटले की, नुकत्याच लागलेल्या Nexon कारला लागलेल्या आगीशी संबंधित घटनेचे तथ्य शोधण्याकरीता आम्ही सखोल तपास करत आहोत. आणि आमची कारवाई पूर्ण झाल्यावरच आम्ही यासंदर्भात सविस्तर माहिती देऊ शकू.आम्ही आमच्या वाहनांच्या आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहोत, असे कंपनीने म्हटले आहे. सुमारे चार वर्षांतील ही पहिलीच घटना असल्याचं सुद्धा कंपनीनं म्हटलं आहे. या चार वर्षाच्या कालावधीत 30,000 हून जास्त इलेक्ट्रीक वाहनांनी एकत्रितपणे देशभरा मध्ये 10 लाख किलोमीटरहून अधिक अंतर कापलं आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेवर प्रश्न
इलेक्ट्रिक कारला आग लागण्याची घटना नवीन नाही, जरी देशातील इलेक्ट्रिक कारला आग लागण्याची ही पहिलीच घटना आहे. याआधी, ओला इलेक्ट्रिक एस1 प्रो स्कूटरला आग लागल्यानंतर इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षेच्या चर्चेला जोर आला होता. यावर्षी मार्चमध्ये तज्ज्ञांची एक समितीही स्थापन करण्यात आली होती, जी इलेक्ट्रिक स्कूटरला लागलेल्या आगीच्या प्रकरणांची चौकशी करून ती कमी करण्याबाबत अहवाल सादर करणार होती.
यावर ओला ईलेक्ट्रीकचे मालक भाविश अग्रवाल यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, कोणत्याही कंपनीच्या ईव्हींना आग लागू शकते. जागतिक दर्जाच्या उत्पादनांनाही आगी लागण्याच्या घटना आहेत. परंतु आयसीई पेक्षा इव्हीना आगी लागण्याचे प्रमाण तुलनेत कमी आहे. असे म्हटले आहे. ओलाच्या स्कूटरला आग लागल्यामुळे भविश अग्रवाल कमालीचे ट्रोल झाले होते. आता टाटाच्या ईव्हीला आग लागल्याने अग्रवाल यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळाली आहे.