Tractor Yojana Maharashtra | ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारकडून 90 टक्के अनुदान मिळणार

Tractor Yojana Maharashtra

Tractor Anudan Yojana: शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसायात प्रगती व्हावी यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार विविध योजना राबवित आहे. तंत्रज्ञान म्हणजेच यांत्रिकीकरण यामधील प्रमुख घटक झाला आहे. जुन्या काळी शेतीचे सर्व कामे बैलाने केली जातं. परंतु, बैलजोडीची कामाला वेळ लागत असल्यामुळे आत्ताच्या काळात यांत्रिकीकरणाचा वापर करत आहे.

ट्रॅक्टरने शेतीची भरपूर कामे होतात. अनेकांना व्यवसायासाठी म्हणा किंवा स्वतःची शेती करण्यासाठी ट्रॅक्टर घ्यायचे असते. परंतु, पैशांअभावी अनेकजण ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाही. तुम्हाला आता पैशाची काळजी करण्याची गरज नाही. सरकारची खास योजना आहे. जिचे नाव ‘मिनी ट्रॅक्टर योजना’ असं आहे. ‘Mini Tractor Anudan Yojana Maharashtra’

ट्रॅक्टर अनुदान योजना

या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टरसाठी 90 टक्के अनुदानावर किंमतीमध्ये मिळवून देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.

शेतकऱ्यांनी सरकारच्या योजनेतून ट्रॅक्टरची खरेदी केली तरच अनुदानाचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांच्या खिशावरचा भार चांगलाच कमी झाला आहे. शेतकऱ्यांना फक्त 10 टक्के रक्कम भरावी लागणार आहे.

सरकारकडून मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी 3.50 लाख रुपये एवढे अनुदान मिळते. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. (Tractor Yojana Maharashtra 2022)

योजनेच्या महत्वाच्या बाबी..Tractor Yojana Maharashtra

▪️ या योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील अर्जदार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
▪️ स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
▪️ बचत गटातील कमीत कमी 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असणे आवश्यक आहे.
▪️ मिनी ट्रॅक्टर व ट्रॅक्टरसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी जास्तीत जास्त 3.50 लाख रुपयांपर्यंत लागतील.
▪️ सरकारकडून तुम्हाला 90 टक्के अनुदान म्हणजेच 3.15 लाख रुपये मिळणार आहे. तुम्हाला फक्त 10 टक्के रक्कम म्हणजेच 35 हजार रुपयांपर्यंत रक्कम भरावी लागेल. (Tractor Anudan Yojana Maharashtra Online Apply)

अर्ज कुठे करायचा?

Tractor Yojana Maharashtra या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या समाज कार्यालयात संपर्क साधून तिथे अर्ज सादर करावा लागेल. योजनेच्या अधिक माहितीसाठी https://bit.ly/3sJUhCg या लिंकवर क्लिक करा.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!