ट्रॅफिक हवालदारला तुमच्या गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे का? जाणून घ्या काय म्हणतो नियम..

Traffic Rules : आजच्या धावपळीच्या जीवनात आपण गाडी चालवत असताना बऱ्याच वेळा चुका करत असतो. जसे की, कार चालवत असताना सीट बेल्ट लावायला विसरलो दुचाकी चालवत असताना हेल्मेट न घालणे, वाहनाचा लाईट किंवा हॉर्न नीट वाजत नसेल तर तो सुद्धा ड्रायव्हिंगचाच दोष मानला जातो.

असं जरी असलं तरी याचा अर्थ असा मुळीच नाही की, ट्रॅफिक हवालदार तुमचे चालान फाडू शकतात अथवा जर ट्रॅफिक हवालदार तुमच्या गाडीची चावी काढत असतील तर ते सुद्धा नियमांच्या विरोधात आहे. शिवाय तुम्हाला अटक करण्याचा किंवा त्यांना वाहन जप्त करण्याचा अधिकार सुद्धा नाही. मात्र, अनेक नागरिकांना याची माहिती नसते, यामुळेच अनेकदा आपल्याकडून झालेली चूक आणि समोर ट्रॅफिक हवालदार असलेले पाहून अनेकांची भांबेरी उडते. पण अशा वेळी आपण आपल्या अधिकारांची आपण माहिती ठेवणे आवश्यक आहे. Traffic Rules

ट्रॅफिक हवालदारांना गाडीची चावी काढण्याचा अधिकार नाही.

भारतीय मोटार वाहन कायदा १९३२ अंतर्गत, केवळ एएसआय (ASI) स्तरावरील अधिकारीच नियमांच्या उल्लंघनासाठी तुमचे चालान कापू शकतात. एएसआय (ASI), एसआय (SI), इन्स्पेक्टर यांना दंड आकारण्याचे अधिकार दिलेले आहेत. यात त्यांना मदत करण्यासाठी ट्रॅफिक हवालदारच असतात. Traffic Rules मात्र त्यांना कुणाच्याही गाडीच्या चाव्या काढण्याचा अधिकार नाही. इतकेच नाही तर ते तुमच्या गाडीच्या टायरची हवासुद्धा काढू शकत नाहीत. ते तुमच्यासोबत चुकीच्या पद्धतीने देखील बोलू शकत नाहीत. जर वाहतूक पोलीस तुम्हाला विनाकारण त्रास देत असतील, तर तुम्ही त्याच्यावरसुद्धा कायद्याने कारवाई करू शकता.

या गोष्टी ठेवा लक्षात

तुमचे चालान कापण्याकरीता वाहतूक पोलिसांकडे ई-चलान मशीन किंवा चालान बुक असणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे जर या दोघांपैकी काहीही नसेल तर तुमचे चालान कापले जाऊ शकत नाही.

शिवाय वाहतूक पोलिसांनी गणवेशात असणे बंधनकारक असून त्यांच्या युनिफॉर्मवर बकल नंबर आणि त्यांचे नाव लिहलेले असावे. जर ते गणवेशात नसतील अशा पोलीस कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे.

ट्रॅफिक पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल तुम्हाला जास्तीत जास्त १०० रुपयांचा दंड करू शकतो. यापेक्षा जास्त दंड फक्त वाहतूक अधिकारी म्हणजेच एएसआय (ASI) किंवा एसआय (SI) अधिकारीच करू शकतात.

जर ट्रॅफिक हवालदार तुमच्या गाडीची चावी काढत असतील तर तुम्ही त्या घटनेचा व्हिडीओ बनवा. आणि हा व्हिडीओ तुम्ही त्या भागातील पोलीस ठाण्यामध्ये जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्याला दाखवून तक्रार करू शकता.

वाहन चालवत असताना तुमच्याकडे तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची मूळ प्रत असावी. जर हे नसेल पीयुसी, वाहन नोंदणी आणि विम्याची झेरॉक्स देखील असली तर चालू शकते.
जर तुमच्याजवळ त्या वेळेस दंडाचे पैसे भरण्यासाठी पैसे नसेल तर तुम्ही नंतरसुद्धा दंड भरू शकता. या परिस्थितीमध्ये न्यायालय चालान जारी करते आणि ते न्यायालयात जाऊन भरावे लागते. या काळामध्ये वाहतूक अधिकारी तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स त्यांच्याकडे ठेवू शकतात.

कलम १८३, १८४ आणि १८५ अंतर्गत कारवाई

या प्रकरणी माहिती देत असताना अधिवक्ता गुलशन बगोरिया यांनी सांगितलं की, मोटार वाहन कायदा १९८८ मध्ये पोलीस कर्मचाऱ्याला वाहन तपासणी-दरम्यान वाहनाची चावी काढण्याचा अधिकार देण्यात आला नाहीये. पोलीस कर्मचार्‍यांनी तपासणी करत असताना वाहन मालकाने वाहन चालविण्याचा परवाना मागितल्यावर वाहनाशी संबंधित कागदपत्रे दाखवावीत.

मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ३, ४ अंतर्गत, वाहन चालकांजवळ त्यांचा ड्रायव्हिंग लायसन्स असणे बंधनकारक आहे. कलम १८३, १८४, १८५ अंतर्गत वाहनाची वेगमर्यादा योग्य असणे आवश्यक आहे. मद्यपान करून वाहन चालवणे, निष्काळजी-पणे वाहन चालवणे इत्यादी कलमांतर्गत दंडासोबत शिक्षेची सुद्धा तरतूद आहे.

Similar Posts