Vilasrao Deshmukh Abhay Yojana

Vilasrao Deshmukh Abhay Yojana | वीज ग्राहकांसाठी खुशखबर! ‘हे’ केले तर वीजबिलात मिळणार 100 टक्के सवलत..

Vilasrao Deshmukh Abhay Yojana
Vilasrao Deshmukh Abhay Yojana

Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2022: नागरिकांसाठी महत्वाची माहिती.. घरगुती विज बिलामध्ये (electricity bill) ग्राहकांना 100 टक्के सवलत मिळणार आहे. याबाबत राज्य सरकार कडून मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे घरगुती विज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यात आलेले भरमसाठ बिल अजूनही राज्यातील लोक भरत आहेत. वीजनिर्मितीसाठी कोळशाच्या अपुऱ्या साठ्यामुळे वीजेचं कमी झालेलं उत्पादन, त्यातून लोडशेडींगची भीती आणि वीज बील थकबाकीचा वाढत चाललेला आकडा यामुळे राज्याच्या उर्जा विभागासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. (Abhay Yojana Scheme)

घरात फॅन, एसी कुलर, रेफ्रिजरेटर या वस्तूंचा जास्त वापर होतो. या काही उत्पादनांचा वापर होत असल्याने उन्हाळ्यात वीजबिल हा नेहमीच त्रासणारा विषय असतो. वीजबिल अशा परिस्थितीत कमी करण्यासाठी आपण विजेचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. ‘Vilasrao Deshmukh Abhay Yojana’

सर्व ग्राहकांसाठी महत्वाची योजना राबविली जाणार आहे. या योजनेत सर्व ग्राहकांनी सहभाग घ्यायला हवा. या योजनेचं नाव ‘विलासराव देशमुख अभय योजना’… या योजनेअंतर्गत लाभ घेतल्यास ग्राहकांना 1 हजार 445 कोटी रुपयांची सवलत मिळणार आहे. या योजनेत सहभागी होऊन विद्युत महामंडळाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत लाभ घेतल्यास 1 हजार 445 कोटींची रुपी सवलत दिल्या जाणार आहे. यामुळे सर्व ग्राहकांनी योजनेत सहभागी होऊन विद्युत महामंडळ महावितरणाला सहकार्य करावे.‌ तसेच यासाठी नियमितपणे तुम्हाला बिल भरावे लागेल. (Abhay Yojana Scheme in Marathi)

Vilasrao Deshmukh Abhay Yojana एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

100 टक्के विजबिल माफी मिळणार..

विलासराव देशमुख अभय योजनेअंतर्गत थकीत असणाऱ्या ग्राहकांना थकबाकीची मूळ रक्कम ही भरावी लागणार आहे. यामुळे त्यांच्या थकबाकीवरील असणारे व्याज व झालेला विलंब आकार 100 टक्के माफ करण्यात येणार आहे. (Vilasrao Deshmukh Abhay Yojana Maharashtra)

मात्र, थकीत असणारी मुद्दल असणारी रक्कम कमी भरल्यास उच्चदाब असणाऱ्या ग्राहकांना 5 टक्के तर लघुदाब ग्राहकांना 10 टक्के मुद्दल रकमेत अधिकची असणारी ही सवलत दिल्या जाणार आहे. जर ग्राहकांना नियमित हप्त्याने भरावयाची असेल, तर मुद्दल असणाऱ्या 30 टक्के रक्कम भरणे गरजेचं आहे. यानंतर, त्यांना उरलेली रक्कम 6 हप्त्यांत भरता येईल.

जर राज्यातील ग्राहकांना या योजनेचा फायदा घेऊन वीजपुरवठा सध्या आहे, त्याच ठिकाणी सुरू करायचा असेल, तर महावितरण वीज पुरवठा सुरू करेल, परंतु जर ग्राहकाला नवीन वीज जोडणी घ्यायची असल्यास नियमानुसार पुन्हा वीजजोडणी शुल्क व अनामत रक्कम भरावी लागणार आहे. (Abhay Yojana Information in Marathi)

मागील अनेक दिवसांपासून ग्राहकांना भरमसाठ वीजबिले पाठविण्यात आली. यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसायला लागला. काही जागी वीज मीटर नसतांना देखील बिले आलीत. यामुळे अनेक जण महावितरणावर अनेकजण नाराज झाले. तर वीजबिले थकीत असल्याने व या सर्व अडचणीसाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.

Similar Posts