PM Vishwakarma Yojana Maharashtra 2023 : विश्वकर्मा योजना ऑनलाईन अर्ज सुरु; असा करा ऑनलाइन अर्ज…

PM Vishwakarma Yojana Maharashtra 2023 : केंद्र सरकारकडून भारतात राहणाऱ्या विविध समाजासाठी नेहमी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. यामध्ये अल्पसंख्यांक वर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग, अश्या विविध वर्गांचा समावेश असतो. चालू 2023 वर्षात भारताच्या अर्थसंकल्पात पंतप्रधान मोदींनी अशाच एका समाजासाठी एक नवीन योजना घोषित केली असून या योजनेचं नाव म्हणजे PM विश्वकर्मा कौशल सन्मान योजना अथवा विश्वकर्मा श्रम सन्मान योजना होय. PM Vishwakarma Yojana

PM Vishwakarma Yojana 2023 : भारताचा अर्थसंकल्प सादर करत असतांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या. ज्यामध्ये शासनाकडून विश्वकर्मा समाजासाठी कल्याणकारी योजना सुरू करण्याची एक महत्वपूर्ण घोषणा सुद्धा केली होती. केंद्र शासनाकडून विश्वकर्मा समाजासाठीच्या या कल्याणकारी योजनेला पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना (PM Vishwakarma Yojana) असं नाव देण्यात आलं असून विश्वकर्मा समाजातंर्गत मोडणाऱ्या सुमारे 140 जातींचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आलेला असून या सर्व प्रवर्गातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

विश्वकर्मा योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे देशभरातील कारागीर व शिल्पकारांची कौशल्य क्षमता वाढवणे असून शासन सुरुवातीला या योजनेसाठी 13,000 कोटीपासून ते 15,000 कोटीपर्यंतची गुंतवणूक करणार आहे. ज्यात कौशल प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि आर्थिक सहाय्य इत्यादींचा समावेश असेल.

विश्वकर्मा योजना महाराष्ट्र Vishwakarma Scheme Maharashtra
PM विश्वकर्मा श्रम सन्मान योजना म्हणजेच PM Vishwakarma Yojana देशातील सर्व राज्यासह महाराष्ट्र सुद्धा लागू आहे.. कारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर विश्वकर्मा समाजातील कारागीर आहे, ज्याt सुतार, नाविक, लोहार, सोनार, कुंभार, शिंपी, धोबी अश्या विविध क्षेत्रातील कारागिरांचा समावेश आहे.

पंतप्रधान विश्वकर्मा योजना लाभ कोणाला मिळणार ?(Vishwakarma Scheme Benefits)

 • सुतार
 • नाविक
 • लोहार
 • कुलुपांचे कारागीर
 • सोनार
 • कुंभार
 • लोहार
 • मूर्तिकार
 • मोची
 • टेलर
 • धोबी
 • मच्छीमार
 • हातोडा इत्यादी कीट बनविणारे कारागीर
 • चटई, झाडू बनविणारे कारागीर
 • लहान मुलांची खेळणी बनविणारे कारागीर
 • वारीक म्हणजेच सलूनमध्ये काम करणारे कारागीर

कौशल विकास प्रशिक्षण आणि अर्थ सहाय्य

PM Vishwakarma Yojanaच्या माध्यमातून कामगारांना जास्तीत जास्त कौशल्य कश्या प्रकारे विकसित करता येईल मुख्यत्व भर यावरच दिला जाणार. शिवाय कामगारांना अत्याधुनिक उपकरण व वेगवेगळ्या डिझाईनची माहिती देण्यात येईल याबरोबरच पारंपारिक कामगारांना अत्यधुनिक यंत्र/उपकरण खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येईल. Vishwakarma Yojanaच्या माध्यमातून कामगारांचे दोन प्रकारचे कौशल्य विकास अभ्यासक्रम घेण्यात येईल. मूलभूत आणि प्रगत, हे कोर्स करणाऱ्या कामगारांना स्टायफंड म्हणून प्रतिदिवस 500 रुपयेसुध्दा देण्यात येणार आहे.

किती मिळणार आर्थिक मदत ?
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना 1 लाखापर्यंत कर्ज देण्यात येणार असून याचा व्याजदर 5% असेल, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये कामगारांना वाढीव 2 लाखापर्यंत कर्ज सवलतीच्या दिले जाईल. कर्जाची परतफेड केल्यावर कामगारांना पीएम विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत PM विश्वकर्मा प्रमाणपत्र बरोबरच ओळखपत्र सुद्धा बहाल करण्यात येईल. आणि महत्वाचे म्हणजे सर्व गोष्टीबरोबरच कामगारांना आधुनिक उपकरण खरेदी करण्यासाठी 15,000 रुपयांची आर्थिक मदतसुध्दा करण्यात येईल.

ही कागदपत्रे लागणार?
● पॅन कार्ड
● आधार कार्ड
● उत्पन्नाचा दाखला
● जातीचा दाखला
● ओळखपत्र
● निवासाचा पत्ता
● पासपोर्ट आकाराचा फोटो
● बँक पासबुक
● आधार कार्ड लिंक असलेला योग्य मोबाइल नंबर

Similar Posts