आताची मोठी बातमी! राज्यभर समूह ‘राष्ट्रगीत गायन’ राज्य सरकारने काढला अध्यादेश | national anthem singing activity on 17th august

national anthem singing activity on 17th august
national anthem singing activity on 17th august

एकनाथ शिंदे सरकारने १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता संपूर्ण राज्यातील जनतेने “स्वराज्य सप्ताह” अंतर्गत एकत्रितपणे राष्ट्रगीत गाण्याचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत दि ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत “स्वराज्य सप्ताह” देशभरात साजरा केला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि. ११ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यभरात राष्ट्रगीताचे (जन, गण, मन) सामूहिक गायन सकाळी ११ वाजल्यापासून सुरु करून ते सकाळी ११.०१ ला संपवावे असे आदेश पारित केले आहेत. national anthem singing activity on 17th august

सादर आदेशाची प्रत बघावयाची असल्यास खालील लिंक वर क्लिक करा. national anthem singing activity on 17th august.

येथे क्लिक करून आदेशाची प्रत बघा.

महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे सरकारने देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे स्मरणीय करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुधवारी सकाळी ११ वाजता महाराष्ट्रातील जनतेने एकत्रितपणे राष्ट्रगीत गायनात सहभागी व्हावे, असे आवाहन सरकारने केले आहे. तसेच सर्व मंत्रालयीन विभाग आणि त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांना सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने गेल्या आठवड्यात काढलेल्या आदेशानुसार राज्य सरकारच्या सर्व विभाग, विद्यापीठे आणि महाविद्यालयातील सर्वांनी यात सहभागी होणे बंधनकारक आहे, तर सर्व नागरिकांनीही या गायनात सहभागी होणे अपेक्षित आहे.

हा केंद्र सरकारच्या ‘स्वराज महोत्सवा‘चा भाग असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यात खासगी आस्थापने, व्यापारी आणि इतर सरकारी विभाग, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सरकारी विभागांनीही यात सहभागी होणे अपेक्षित आहे, असे आदेशात म्हटले आहे. राष्ट्रगीत गाण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोकळ्या मैदानात एकत्र येणे अपेक्षित आहे. ग्राम स्तरावर सर्व पंचायत समित्यांना तसेच वॉर्ड स्तरावील सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आदेश दिले आहेत.

हे देखील वाचा-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!