Voter List Download: गावानुसार मतदान यादी अशी डाऊनलोड करा

Voter List Download
Voter List Download

Voter List Download 2022: राज्य निवडणूक आयोगाने सुमारे 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्याने पुन्हा एकदा गावात गुलाल उधळणार आहे. यामध्ये आपल्याला मतदान करण्यासाठी मतदान यादीत नाव असणं आवश्यक आहे.

voter list download maharashtra भारतीय नागरिक म्हटलं की, आपलं नागरिकत्व ठरतं ते आपल्या ओळखपत्रावरून म्हणून मतदान ओळखपत्र हे आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाचं आहे. मतदान कार्ड नसल्याशिवाय मतदानाचा हक्क बजावता येत नाही.

मतदान कार्ड करिता अर्ज करण्यासाठी 18 वर्षें पूर्ण असणं आवश्यक आहे. आता अनेकांनी ग्रामपंचायत निवडणूका जाहीर होण्याअगोदर मतदान कार्ड करिता अर्ज केलेले असेल. गावातील प्रत्येक व्यक्तींना ग्रामपंचायत निवडणूका आले की, मतदार यादी पाहण्याची इच्छा असते. Voter Card List 2022

भारतीय संविधानानुसार भारतातील प्रत्येक नागरिकाचं मतदान करणं हक्क आहे. मतदार ओळखपत्र करिता 18 वर्षांवरील प्रत्येक भारतीय नागरिक अर्ज करू शकतात. मतदान कार्ड मतदान करण्यासाठी जेवढं आवश्यक आहे, तेवढेच ओळखपत्र म्हणून देखील महत्वाचे आहे. Matdar Yadi 2022 Maharashtra

ग्रामपंचायत निवडणूका आल्याने नवीन मतदार यादी आली आहे. मतदार यादी पाहण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही मोबाईलवर मतदार यादी डाऊनलोड करू शकता. चला तर जाणून घेऊया मतदार यादी मोबाईलवर कशी पाहायची. Voter Card List Maharashtra.

मतदान यादी अशी डाऊनलोड करा
मतदार यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम https://electoralsearch.in/ या वेबसाईटवर जा.
या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला Search in Election Roll (सर्च इन इलेक्शन रोल) असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
यानंतर, आपला जिल्हा, मतदारसंघ म्हणजे तालुका आणि आपले गाव शोधून, कॅप्चा कोड टाका.
सर्वांत शेवटी ‘Open PDF‘ बटणावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मतदान यादी पीडीएफ डाऊनलोड होण्यास सुरुवात होईल.

अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या मोबाईलवर गावानुसार मतदार यादी डाऊनलोड करू शकता. ही माहिती सर्व नागरिकांसाठी महत्वाची आहे. आपणं थोडंसं सहकार्य करून ही माहिती पुढे देखील आपल्या मित्र व मैत्रिणींना नक्की शेअर करा.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!