औरंगाबाद मधील शाळा बंदच राहणार..
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याची माहिती दिली असली तरी औरंगाबादमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग बघता शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी घेतला आहे. औरंगाबाद मध्ये पोसिटीव्हीटी रेट 35% असल्याने लगेच शाळा सुरू करता येणार नाहीत.
⏳ आयुक्तांची Wait & Watch ची भूमिका
पुढचे आठ दिवस परिस्थितीचं निरीक्षण करणार आणि संसर्गाचं प्रमाण कमी होत असल्याचं जाणवलं तरच औरंगाबादमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणार, असं आयुक्तांनी सांगितलं.