औरंगाबाद शहरात हत्येचे सत्र सुरूच..!टीव्ही सेंटर भागात तरुणाचा दगडाने ठेचून खून! खून केल्यानंतर मयताचे गुप्तांग जाळण्यात आले.
औरंगाबाद शहरात गुन्हेगारीचे प्रमाण खूपच वाढले आहे, काही दिवसापूर्वी मिसरवाडी भागात नऊ जणांनी मिळून एका यवकावर 36 वार करून निर्घृण केला होता.
या घटनेला काही दिवस जात नाही तेच आता टीव्ही सेंटर भागातील शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या आवारात खूनाची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
सर्वात आधी एका सिद्धार्थच्या डोक्यात मोठा दगड डोक्यात घालून त्यांचा निर्घृण खून केला. त्यानंतर चक्क गुप्तांग जाळल्यावर मृतदेहदेखील जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सिद्धार्थ साळवे वय 32 वर्षे रा. सिद्धार्थ नगर असे मयत व्यक्तीचे नाव असून ते एका खाजगी रुग्णालयात कामाला होते..
या खुनाबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जुन्या वादातून हा खून झाला असावा असा संशय पोलीस व्यक्त करत आहेत. तसेच एका पेक्षा अधिक मारेकऱ्यांचे हे कृत्य असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा खून होऊन २४ तासाहून अधिक वेळ झाला असावा अशी माहिती देखील समोर येत आहे.
सिद्धार्थ विवाहित असून त्यांना एक मुलगा आहे. सिद्धार्थचे सतत पत्नीसोबत वाद व्हायचे, अशी माहिती समोर आली आहे.
सिद्धार्थचे कुटुंबीय सिडको ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेले आहेत. पोलिसांनी मृतदेह घाटीत नेला असून उत्तरीय तपासणी सुरू आहे. सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.