केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली अप्रत्यक्षपणे इंदिरा गांधी यांच्यावर टीका…

औरंगाबाद शहरातील दोन लाख कुटूंबांना पाइनलाइनद्वारे गॅस पुरवठा योजनेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना रावसाहेब दानवे यांनी नरेंद्र मोदींची स्तुती केली. तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली..

इंदिरा गांधींबाबत दानवे यांचे वक्तव्य ?

औरंगाबाद शहरातील गॅस पाईपलाईनच्या उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिगंवत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नाव न घेता टीका केली. दानवे म्हणाले की, एक महिला पंधरा वर्ष पंतप्रधान होती. पण तिने कधीच महिलांचं दुःख तिनं समजून घेतलं नाही. फक्त चूल आणि मूल हेच महिलांचं काम आहे, असं त्यांना वाटत होतं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि प्रत्येक घरातील चुलीसमोर बसलेल्या महिलांचे दुःख दूर करण्यासाठी त्यांनी 100 रुपयात गॅस उपलब्ध केला.

आज औरंगाबाद शहरामध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात घराघरात पाईपलाईनच्या माध्यमातून गॅस उपलब्ध करून देणाऱ्या योजनेचा शुभारंभ होत आहे.

ही गॅस पाईपलाईन तब्बल 60 किलोमीटर अंतरापर्यंत ही असेल. आणि येणाऱ्या सहा महिन्यात औरंगाबाद शहरातल्या पहिल्या ग्राहकाला गॅसचा पाईपलाईन द्वारे पुरवठा सुरू करणार आहे, तर येणाऱ्या दोन वर्षाच्या काळात तब्बल दोन लाख नागरिकांना पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा केला जाणार आहे, असं आश्वासन भाजपच्या वतीने देण्यात आलं आहे.

या गॅस पाईपलाईन योजनेचे उद्घाटन आज शहरातील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर करण्यात आले. औरंगाबाद शहरातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती.

Similar Posts