महेश मांजरेकरांच्या “या” चित्रपटाच्या प्रोमोवर राज्यभरातुन होतोय संताप व्यक्त…
चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरण भात लोंचा कोन नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहून चित्रपटाच्या ट्रेलरमधील बोल्ड आणि लैंगिक दृश्यांवर सेन्सॉरची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाण कामगारांना अशी वागणुक देणे अत्यंत निषेधार्य आहे. हा चित्रपट १४ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.
‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ च्या पोस्टरमध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखा दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटाची कथा सुमारे तीन दशकांपूर्वीची आहे. संपाचा गिरणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होणारा दु:खद परिणाम, त्यांची दुर्दशा, त्यांचे दु:ख, संपामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली पिढी आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ मध्ये दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात प्रेम धर्माधिकारी, वरद नागवेकर, छाया कदम, शशांक शेंडे, रोहित हळदीकर, कश्मिरा शहा, उमेश जगताप, गणेश यादव, अतुल काळे, अश्विनी कुलकर्णी, सविता मालपेकर आणि ईशा दिवेकर यांच्या भूमिका आहेत.
गिरणी कामगार संपामुळे जरी थोडा खचला तरी त्याने हार मानली नाही. घरातल्या घरधन्यासोबत त्याची पत्नी कामासाठी बाहेर पडली. मुलांनी नाईट कॉलेज करून शिक्षण पूर्ण केले आहे. अनेक गिरणी कामगारांची मुले आज मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मोठमोठ्या हुद्यावर काम करत आहेत. असे असताना महेश मांजरेकर पैसा, प्रसिद्धीसाठी मराठी माणसांची, गिरणी कामगारांची अब्रू वेशीवर टांगत आहेत. हे करत असताना मराठी माणसांसाठी झटतो म्हणून सांगणारे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष गप्प का बसलेत? शिवसेनेची आणि मनसेची चित्रपट सेना यावर मूग गिळून गप्प का बसलेत? असा सवाल आता विचारला जात आहे.