वेगवेगळ्या दोन घटनेमध्ये लग्नाचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार..

दोन वेगवेगळ्या घटनेमध्ये 14 आणि 15 वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलींवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ दोन्ही आरोपींना अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी दिली.

पहिल्या घटनेमध्ये संजयनगर येथील रहिवासी अमोल सुभाष पवार याने 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ऑगस्ट 2021 ते 22 फेब्रुवारी 2022 पर्यंत लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला.

आरोपी अमोलचा विवाह झाला असून त्याला दोन मुले आहेत. पिडीत मुलगी अमोलच्या मुलांना खेळवण्यासाठी त्याच्या घरी येत होती. तेव्हा अमोल आपण पहिल्या पत्नीला सोडून देऊन तुझ्या सोबत लग्न करणार असल्याचे सांगून अत्याचार करीत होता. ही बाब पीडितेच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. बलात्कारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी अमोलला अटक केली असून पुढील तपास उपनिरीक्षक प्रवीण वाघ करत आहेत.

तर दुसऱ्या घटनेमध्ये मुकुंदनगर येथे घडली असून सदर पिडीत मुलीचे वय 15 वर्षाचे आहे. सदर पिडीता मुकुंदनगर येथील आजीकडे आल्यावर तिची ओळख आरोपी लक्ष्मण उर्फ अक्षय गोविंद दराडे (21) याच्या बरोबर झाली. आरोपी लक्ष्मणने तिला मी तुझ्या बरोबर लग्न करणार असे आमिष दाखवून नोव्हेंबर 2020 ते 22 फेब्रुवारी 2022 पर्यंत खूप वेळ अत्याचार केला. मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक निरीक्षक सचिन मिरधे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!