संतापजनक | क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर फटाक्याचा कचरा जाळल्याचा प्रकार समोर..

क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच्या चौथऱ्यावर अज्ञातांनी फटाक्याचा कचरा जाळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. अद्याप अनावरण देखील न झालेल्या पुतळ्याच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.

चौथऱ्यावर फटाक्यांचा जळलेला कचरा असल्याची माहिती मिळताच शिवप्रेमींकडून तातडीने साफसफाई करण्यात आली. मात्र हा प्रकार करणारा समोर आला तर त्यास अद्दल घडवणार असल्याचा संताप शिवप्रेमी व्यक्त करत आहेत. तसेच स्मार्ट सिटीच्या माध्यमातून येथे सुरक्षा रक्षक नेमावा व सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!