आजची कोरोना आकडेवारी
औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 16 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 463 जण कोरोनामुक्त, 1 मृत्यू तर 494 रुग्णांवर उपचार सुरू.
जिल्ह्यात आज 463 जणांना (मनपा 433, ग्रामीण 30) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 65 हजार 322 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 16 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 69 हजार 542 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 726 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 494 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शहर रुग्ण संख्या (12)
कांचनवाडी 1, शिवाजी नगर 1, एन – 8 येथे 1, उल्का नगरी 1, चेतना नगर 1, तिरुपती विहार 1, अन्य 6
ग्रामीण (04)
मृत्यू (01)
घाटी (01)
1. 75 पुरुष, खंडाळा, ता.वैजापुर