औरंगाबाद जिल्ह्यात आजची कोरोना रुग्ण संख्या..

औरंगाबाद जिल्ह्यात आज दिनांक 2 मार्च 2022 रोजी एकूण 10 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 120 जण कोरोनामुक्त तर 88 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 120 जणांना (मनपा 112, ग्रामीण 08) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 65 हजार 820 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण दहा कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 69 हजार 640 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 732 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 88 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

शहर रुग्ण संख्या (07)

अन्य 07

ग्रामीण (03)

गंगापूर 02, वैजापूर 01

Similar Posts